ravi shastri 
क्रीडा

37 वर्षांपूर्वीची ऑडी कार पाहून रवी शास्त्री झाले भावूक

1985 मध्ये रवी शास्त्री यांना पहिल्यांदा कार मिळाली होती

Kiran Mahanavar

Ravi Shastri Audi 100 Car: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्या कारचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. रवी शास्त्रींनी 'Audi 100 Car' चा 37 वर्षे जुना फोटो शेअर केला आहे. 1985 मध्ये बेन्सन अँड हेजेस क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर यांनी हे बक्षीस मिळाली होती.

37 वर्षांनंतर ही ऑडी कार पाहून माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री भावुक झाले. हा खास फोटो शेअर करत शास्त्रींनी लिहिले की, सर्व काही तसेच आहे जे 1985 मध्ये होत. मी ऑडी कार चालवतो आणि ते भावनिक क्षण! ही सगळे देशाची संपत्ती आहे. गौतम सिंघानिया यांनी ही विंटेज ऑडी १०० कार माजी मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांच्याकडे सुपूर्द केली आहे. 1985 मध्ये रवी शास्त्री यांना पहिल्यांदा कार मिळाली होती त्याच लूकमध्ये परत आणण्यात आली आहे.

शास्त्रींनी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम खेळ दाखवत पाच सामन्यांमध्ये 45.50 च्या सरासरीने 182 धावा केल्या आणि 8 विकेट घेतल्या. त्याच्या या विशेष कामगिरीसाठी त्यांना टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला होता. शास्त्रींना ही गाडी मिळाल्यानंतर सर्व खेळाडूंनी कारमध्ये बसून मैदानाचा फेरफटका मारला होता. त्यावेळी ऑडी कार मिळणे ही खेळाडूंसाठी मोठी गोष्ट होती.

क्रिकेटपासून दूर झाल्यावर शास्त्रींनी कॉमेंट्रीमध्ये झेंडा रोवला. याशिवाय रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पण बनले. शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने 76 एकदिवसीय सामने आणि 65 टी-20 सामने खेळले आहे. ज्यामध्ये 51 एकदिवसीय सामने जिंकले आणि 43 टी-20 सामने जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT