Ravi Shastri Betting In India  
क्रीडा

सट्टेबाजी कायदेशीर करा, शास्त्रींची मोदी सरकारकडे मागणी

सट्टेबाजीने देशाला महसूल गोळा करण्याचे चांगले साधन मिळेल : शास्त्री

अनिरुद्ध संकपाळ

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे टीम इंडियाचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सातत्याने प्रकाशझोतात आहेत. त्यांनी अनेक विधाने करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. आता ते भारतातील सट्टेबाजीबाबत (Betting) विधान करुन पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.

रवी शास्त्री यांनी भारतीतील क्रीडा विश्वातील सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळावी असे मत व्यक्त केले. यामुळे देशाला एक महसूल गोळा करण्याचे चांगले साधन मिळेल. याबरोबरच सरकारला यावर लक्ष ठेवण्यासही मदत होईल. असेही ते म्हणाले. (Betting In Sports)

भारतात आजून पर्यंत तरी सट्टेबाजी बेकायदेशीर आहे. मात्र लॉ कमिशन (Law Commission) ऑफ इंडियाने २०१८ मध्ये खेळामध्ये सट्टेबाजी कायदेशीर करण्याची शिफारस केली होती. याचबरोबर त्यांनी बीसीसीआयने अनधिकृत सट्टेबाजी रोखण्यासाठी केलेली उपाययोजना अपुरी आणि उपयुक्त नाही असेही सांगितले होते.

या अहवालात 'सट्टेबाजीवर कारवाई करण्यात सक्षम नसल्याने अनधिकृतरित्या सट्टेबाजी करणाऱ्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे काळा पैसा (Black Money) तयार होण्यास मोठी मदत होत आहे. यावर पूर्णपणे नियंत्रण आणणे शक्य नसल्याने ते कायदेशीर करणे हा एकमेव उपाय उरतो.' असे मत व्यक्त करण्यात आले होते.

दरम्यान, इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात रवी शास्त्री यांना तुम्ही भारतात क्रीडा विश्वातील सट्टेबाजी कायदेशीर (Betting In India) करण्याचे समर्थन करता का असे विचाण्यात आले होते. त्यावेळी रवी शास्त्री यांनी देशाला कराच्या रुपात याचा फायदाच होईल. यातून सरकारला चांगला महसूल गोळा करता येईल. सरकार जेवढी सट्टेबाजीवर कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तेवढीच दुसऱ्या मार्गाने सट्टेबाजी अधिक वेगाने फोफावेल. त्यामुळे सट्टेबाजी कायदेशीर करुन त्यातून पैसा कमवणे योग्य होईल असे उत्तर दिले.

याचबरोबर रवी शास्त्री यांनी जागतिक स्तरावर गेल्या ४० वर्षात बीसीसीआय(BCCI) ही एक उत्तम संस्था म्हणून नावारुपाला आली आहे असे सांगितले. तसेच राजकीय व्यक्तींनी भारतीय क्रिकेट बोर्ड (Board of Cricket Control In India) चालवण्याचेही समर्थन केले. राजकारण्यांनी क्रिकेट बोर्डात उत्तम काम केल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT