Ravi Shastri Share Photo With Sundar Pichai Mukesh Ambani Kevin Pietersen Reaction esakal
क्रीडा

Ravi Shastri : रवी शास्त्रींचे सुंदर पिचाई अन् मुकेश अंबानींसोबत फोटोसेशन

अनिरुद्ध संकपाळ

Ravi Shastri : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आता पुन्हा एकदा समालोचनाकडे वळले आहेत. ते सध्या स्काई स्पोर्ट्ससाठी समोलोचन करतात. रवी शास्त्री हे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड स्पर्धेत समालोचन करत आहेत. दरम्यान, द हंड्रेड स्पर्धेच्या लॉर्ड्सवरील सामन्यात समालोचन करत असताना रवी शास्त्रींची गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि भारतातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी भेट झाली. या भेटीचा फोटो रवी शास्त्रींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Ravi Shastri Share Photo With Sundar Pichai Mukesh Ambani Kevin Pietersen Reaction)

रवी शास्त्री यांनी सुंदर पिचाई आणि मुकेश अंबानी यांच्या सोबतचा फोटो शेअर करत त्याला 'दोन जबरदस्त व्यक्तीमत्वांची साथ लाभली. ही व्यक्तीमत्वे क्रिकेटवर खूप प्रेम करतात. मुकेश अंबानी आणि सुंदर पिचाई' असे कॅप्शन दिले. दरम्यान, रवी शास्त्रींच्या या फोटोवर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने देखील प्रतिक्रिया दिली. त्याने खास इमोजी शेअर करत फोटो जबरदस्त असल्याचे सांगितले.

जगभरात वनडे क्रिकेटची जागा आता टी 20 आणि फ्रेंचायजी क्रिकेट घेईल असा अंदाज क्रिकेट जाणकार व्यक्त करत आहेत. रवी शास्त्री यांनी देखील द्विपक्षीय वनडे मालिका बंद कराव्यात अशी मागणी केली आहे. ते म्हणाले होते की, 'मी द्विपक्षीय मालिकांबाबत सतर्क आहे. टी 20 क्रिकेटमध्ये खूप फ्रेंचायजी क्रिकेट होत आहे. यात वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान या देशांचा देखील समावेश आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'तुम्ही द्विपक्षीय मालिका कमी खेळू शकता. तुम्ही थेट वर्ल्डकपमध्ये एकत्र खेळू शकता. यामुळे आयसीसी वर्ल्डकप सारख्या स्पर्धांचे महत्व वाढेल. लोक ते पहायला उत्सुक राहतील. मला असे वाटते की दोन स्तरांची गरज आहे नाही तर 10 वर्षात कसोटी क्रिकेट संपून जाईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT