Ravi Shastri Wants A Say In Team Selection In Second Innings As Head Coach
Ravi Shastri Wants A Say In Team Selection In Second Innings As Head Coach 
क्रीडा

आता मी विराटचे ऐकणार नाही, संघ मीच निवडणार : शास्त्री

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारती संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुन्हा नियुक्ती झाली. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ आता आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याकडे लक्ष देईल. पुन्हा प्रशिक्षक झाल्यानंतर शास्त्रींनी मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीचे न ऐकता स्वत: संघ निवडीत लक्ष घालण्याची परवानगी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

विश्वकरंडकात आणि त्याआधीही शास्त्रींना अनेकवेळी संघ निवडीपासून लांब ठेवण्यात आले. अनेकवेळा फक्त विराट कोहली आणि निवड समिती यांनीच संघनिवड केली आहे. याविषयी शास्त्री काय बोलले हे सांगताना सल्लागार समिती म्हणाली,''संघ व्यवस्थापनाला मधल्या फळीत हवे ते खेळाडू मिळाले नाहीत. संघ व्यवस्थापनालाही संघ निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये आता सहभागी करुन घ्यायला हवे अशा शास्त्रींची इच्छा आहे,'' असे मत सल्लागार समितीने व्यक्त केले. 

विश्वकरंडकादरम्यान अंबाती रायुडूच्याऐवजी विजय शंकरला संघात स्थान दिल्यानंतर निवड समिती आणि कोहलीवर खूप टीका करण्यात आली. त्यानंतर सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यावर त्याच्याजागी रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. त्यावरुनही बरीच नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT