West Indies vs India 1st Test New esakal
क्रीडा

WI vs IND Ashwin : WTC फायनलमध्ये बेंचवर असलेल्या अश्विनचा पंजा, रोहितला दिले जोरदार प्रत्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 1st Test News : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्याच दिवशी भारताने वेस्ट इंडीजचा पहिला डाव 150 धावात गुंडाळला. भारताकडून फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 60 धावात 5 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजाने 26 धावात 3 विकेट्स घेतल्या. विंडीजकडून अलिक अथिनाजेने सर्वाधिक 47 धावा केल्या.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या WTC Final मध्ये आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या अश्विनला रोहित - राहुलने बेंचवर बसवले होते. मात्र विंडीज दौऱ्यावरील पहिल्याच कसोटीत 5 विकेट्स घेऊन त्याने सर्वांना प्रत्युत्तर दिले. अश्विनने 33 वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

पहिल्या सत्रातच फिरकीने पाडले खिंडार

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना आपला दबदबा निर्माण केला. विंडीजच्या सलामीवीरांनी पहिल्या 10 षटकात भारताला एकही विकेट न देता चिवट फलंदाजी केली.

मात्र त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी पहिल्या दिवसापासूनच सामन्यावर पकड निर्माण करण्यास सुरूवात केली. अश्विनने तेगनारायण चंद्रपॉल आणि क्रेग ब्रेथवेटला बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने रेमॉरला 2 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला. पहिल्या सत्राचा खेळ संपण्यापूर्वी रविंद्र जडेजाने ब्लॅकवूडला 14 धावांवर बाद करत विंडीजचा चौथा झटका धक्का दिला.

दुसऱ्या सत्रात विंडीजची धडपड मात्र...

दुसऱ्या सत्राची सुरूवात देखील जडेजाने विकेटने केली. त्याने जोशुआ सिल्वाला 2 धावांवर बाद करत विंडीजची अवस्था 5 बाद 76 धावा अशी केली. यांनतर आलेल्या अनुभवी जेसन होल्डरने अकिल अथनाजेच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली.

ही भागीदारी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच मोहम्मद सिराजने होल्डरला 18 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अश्विनने विंडीजची शेपटी गुंडाळण्यात फार वेळ लावला नाही.

त्याने आधी अल्झारी जोसेफला 4 धावांवर बाद करत आपला 700 वा बळी टिपला. त्यानंतर अथनाजेला 47 धावांवर बाद करत विंडीजला मोठा धक्का दिला. चहापानासाठी खेळ थांबला त्यावेळी विंडीजच्या 58 षटकात 8 बाद 137 धावा झाल्या होत्या.

तिसऱ्या सत्रात विंडीजला गुंडाळले

चहापानानंतर 8 बाद 137 धावांपासून पुढे खेळण्यास आलेल्या विंडीजचा डाव भारताने 150 धावात गुंडाळला. जडेजाने रोचला 1 तर अश्विनने वारिकनला 1 धावेवर बाद केले. भारताने आपल्या पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 66 धावा केल्या होत्या. पदार्पण करणारा यशस्वी जैसवाल 28 तर रोहित शर्मा देखील 28 धावा करून नाबाद होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT