क्रीडा

R.Ashwin:'आश्विन स्वार्थी खेळाडू, तो फक्त...', भारताच्या माजी दिग्गजाने आरोप करत ओढले ताशेरे

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी हाही आरोप केला की, जर आश्विन २०११च्या आधी चेन्नई सुपर किंग्ज संघात महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला नसता, जो त्यावेळी भारताचाही कर्णधार होता, तर त्याला भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जास्त काळ लागला असता.

Manoj Bhalerao

R.Ashwin in World Cup: रविचंद्रन आश्विन हा भारताचा महत्वाचा फिरकीपटू आहे. भारताचे माजी फरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आश्विनवर टीका केली आहे. शिवरामकृष्णन यांनी सेना देशांमध्ये आश्विनच्या विकेट घेण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. हे प्रश्न त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले. भारतामध्ये खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी जी खेळपट्टी तयार केली जाते, ती आश्विनला उपयुक्त होईल अशा पद्धतीने तयार केली जाते, असा आरोप त्यांनी केला.

लक्ष्मण शिवरामकृष्णन ट्वीट करत म्हणाले की,"भारतीय फलंदाज फिरकीपटूंविरोधात संघर्ष करताना दिसत आहेत, कारण खेळपट्टी आश्विनला उपयुक्त असावी अशा हिशोबाने तयार केली जात आहे.त्याचं सेना देशांमधलं प्रदर्शन बघा". त्यानंतर त्यांनी आश्विनला 'स्वार्थी स्टॅट्स खेळाडू' म्हटलं, म्हणजे असा खेळाडू जो स्वत:ची आकडेवारी सुधारण्यासाठी खेळतो.

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी हाही आरोप केला की, जर आश्विन २०११च्या आधी चेन्नई सुपर किंग्ज संघात महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला नसता, जो त्यावेळी भारताचाही कर्णधार होता, तर त्याला भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जास्त काळ लागला असता.(Latest Marathi News)

शिवरामकृष्णन यांनी आश्विनच्या ब्रॉडकास्टिंगवर देखील ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, "जेव्हा तो माईक उचलतो, तेव्हा तो जगातील सर्वोत्तम बुलशीटर असतो. तुम्हाला त्याला मिळणारे पैसे बघून आश्चर्य वाटेल ." आश्विन समाज माध्यमांवर जास्त सक्रिय असतो आणि क्रिकेटमधील घडत असलेल्या गोष्टींवर आपलं मत मांडतं असतो आणि त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर व्हिडीओ बनवत असतो.

यंदाच्या विश्वचषकाच्या संघामध्ये आश्विनचा समावेश नव्हता. मात्र, अक्सर पटेल दुखापतग्रस्त झाल्याने त्याला ऐन मोक्याच्यावेळी संघात स्थान देण्यात आले. भारताच्या संघात ऑफ स्पिनरची कमी होती. आश्विनच्या अनुभवाचा फायदा भारताला होऊ शकतो. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

SCROLL FOR NEXT