Ravichandran Ashwin Jonny Bairstow Vs Alex Carey esakal
क्रीडा

Ravichandran Ashwin : बेअरस्टो - कॅरी वाद! अश्विननं एक वेगळाच अँगल आणला समोर, म्हणतो...

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin Jonny Bairstow Vs Alex Carey : ज्या ज्या वेळी क्रिकेट वर्तुळात खेळभावनेची चर्चा होते त्या त्यावेळी रविचंद्रन अश्विन चर्चेच्या केंद्रस्थानी येतोच. आता अॅशेस मालिकेतील लॉर्ड्स कसोटीत एलेक्स कॅरीने जॉनी बेअरस्टोला रन आऊट केले. यानंतर क्रिकेट वर्तुळात वादंग निर्माण झाले आहे. बेसावध असताना जॉनी ब्रेअरस्टोला कॅरीने डायरेक्ट हिट करत रन आऊट केले. यानंतर खेळ भावनेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या प्रकरणावर आता अश्विनने आपले मत व्यक्त केले. त्याने ट्विट केले की, 'आपल्याला एका तथ्यावर स्पष्टपणे लक्ष दिलं पाहिजे. त्या कसोटी सामन्यात विकेटकिपर स्टम्पपासून फार लांब नव्हता. विकेटकिपर कसोटीत वेगवान गोलंदाजाविरूद्ध सहसा लांब उभा राहतो. मात्र जर एखादा फलंदाज सारखा सारखा क्रिजच्या बाहेर जात असेल असं लक्षात आल्यानंतर विकेटकिपर जवळ बोलवण्यात येतो.'

अश्विन पुढे म्हणाला की, 'आपण इथं खेळ भावनेला अचानकपणे मधे न आणता त्या वक्तीच्या खेळाबाबतच्या स्मार्टनेसबाबत त्याचं कौतुक करायला हवं.'

ज्यावेळी अश्विनला त्याच्या ट्विटबाबत पत्रकाराने विचारले त्यावेळी त्याला बेअरस्टोला ज्या प्रकारे बाद दिलं तसं तुला दिलं तर आवडेल का? याबाबत अश्विन म्हणाला की, 'मी नक्कीच नाराज झालो असतो. खूप नाराज झालो असतो. मी स्वत: लाच म्हणालो असतो की मी अशा प्रकारे कसं बाद होऊ शकतो.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT