Ravichandran Ashwin esakal
क्रीडा

Ravichandran Ashwin : अश्विन @700! कुंबळे - हरभजनला जे जमलं नाही ते या फिरकीपटूनं करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा डॉमिनिका येथील विंडसर पार्कवर खेळवला जात आहे. या कसोटीत खेळपट्टी फिरकीला साथ देईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र चेंडू पहिल्या दिवसापासूनच टर्न होऊ लागल्याने विंडीजचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय फसला. (West Indies vs India 1st Test News)

भारताचा अव्वल फिरकीपटू आणि आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या रविचंद्रन अश्विनने आपली जादू दाखवत विंडीजचा जवळपास निम्मा संघ माघारी धाडला. याचदरम्यान, त्याने अल्झारी जोसेफनला 4 धावांवर बाद करत आपला 700 वा आंतरराष्ट्रीय बळी टिपला.

भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 700 पेक्षा जास्त विकेट घेणारा अश्विन हा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळेने 956 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या खालोखाल हरभजन सिंगचा नंबर लागतो. त्याने 711 विकेट्स घेतल्या आहेत. (Ravichandran Ashwin Cricket Record)

मात्र अश्विनने या दोघांनाही सर्वात कमी चेंडू टाकून 700 विकेट्स मिळवण्याच्या बाबतीत मागे टाकले. अश्विन कमी चेंडू टाकत सर्वात वेगवान 700 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याचबरोबर रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये वडील आणि मुलाला बाद करणारा इतिहासातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

अश्विनने विंडीजची शेपटी गुंडाळण्यात पार वेळ लावला नाही. त्याने आधी अल्झारी जोसेफला 4 धावांवर बाद करत आपला 700 वा बळी टिपला. त्यानंतर अथनाजेला 47 धावांवर बाद करत विंडीजला मोठा धक्का दिला. चहापानासाठी खेळ थांबला त्यावेळी विंडीजच्या 58 षटकात 8 बाद 137 धावा झाल्या होत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT