IND vs ENG  ESAKAL
क्रीडा

IND vs ENG : भज्जी अन् कुंबळेवर अश्विन - जडेजा जोडी पडली भारी; कसोटीत केला दमदार विक्रम

Ravichandran Ashwin Ravindra Jadeja : अश्विन - जडेजा जोडीने केला मोठा विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG Ravichandran Ashwin Ravindra Jadeja : हैदराबाद येथे सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी दमदार गोलंदाजी केली. पहिल्या दोन सत्रातच इंग्लंडचा निम्म्यापेक्षा जास्त संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या जोडगोळीने इंग्लंडच्या बॅझबॉलला सुरूंग लावला.

रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या पहिल्या तीन विकेट्स घेत टॉप ऑर्डर उडवली. याचबरोबर त्यांनी एका मोठ्या विक्रमाला देखील गवसणी घातली. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी मिळून भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम दिग्गज अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्या नावावर होता.

अश्विन आणि जडेजाने इंग्लंडच्या तीन विकेट्स घेत आपली विकेट्सची टॅली 503 वर पोहचवली. यापूर्वी भारताकडून कसोटीत कुंबळे आणि हरभजनने मिळून सर्वाधिक 501 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हरभजन आणि जहीर खान या जोडीचा समावेश आहे. त्यांनी भारतासाठी मिळून 474 विकेट्स घेतल्या.

अश्विनने भारताला पहिल्या दिवशी पहिली विकेट मिळवून दिली. त्याने बेन डकेटला बाद करत सलामी जोडी फोडली. त्यानंतर रविंद्र जडेजाने 1 धाव करणाऱ्या ओली पोपला बाद केलं. पाठोपाठ अश्विनने दुसरा सलामीवीर क्राऊलीला बाद करत अजून एक सेट बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये धाडला.

यानंतर मात्र बेअरस्टो (37) आणि जो रूट (29) यांनी चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. मात्र जडेजा आणि अक्षरने या दोघांनाही बाद करत इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT