Ravichandran Ashwin World Cup 2023  esakal
क्रीडा

Ravichandran Ashwin : ICC स्पर्धेपूर्वी षडयंत्र करून भारताला 'संभाव्य विजेता' ठरवतात... अश्विनचं धक्कादायक वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin World Cup 2023 : भारतीय संघाचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सध्या ब्रेकवर आहे. मात्र या दरम्यान तो आपल्या यूट्यूब चॅनलवरून एका पाठोपाठ एक मोठमोठी वक्तव्य करून प्रकाश झोतात येत आहे. नुकतेच त्याने संभाव्य विजेत्याबाबत एका धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

भारतीय संघ ज्या कोणत्याही आयसीसी स्पर्धेत सहभागी होते त्या स्पर्धेचे ते कायम संभाव्य विजेते असतात. आगामी वनडे वर्ल्डकपमध्ये देखील असंच होणार आहे. अश्विनने स्पर्धेच्या संभाव्य विजेत्या संघांबाबत एक वेगळाच दृष्टीकोण ठेवला.

अश्विनच्या मते भारताला संभाव्य विजेता घोषित करणे हे विरोधी संघाचे एक षडयंत्र असते. त्यांना स्वतःवरील दबाव कमी करून तो भारतावर टाकायचा असते. (Ravichandran Ashwin Statement)

अश्विन आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, 'मला माहिती आहे की क्रिकेट जगतातील लोक हे भारत वर्ल्डकपचा संभाव्य विजेता आहे असं म्हणणार आहेत. जगभरातील सर्व क्रिकेटपटू या रणनितीचा अवलंब करतो आणि प्रत्येक आयसीसी स्पर्धेत भारताला संभाव्य विजेता म्हणतो. ते आपला दबाव कमी करतात आणि आमच्यावर अतिरिक्त दबाव टाकतात.'

ऑस्ट्रेलिया एक पॉवर हाऊस

भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी अजून एक प्रबळ दावेदाराबाद्दल बोलताना अश्विन म्हणाला, 'ऑस्ट्रेलिया देखील एक पॉवर हाऊस आहे. आपण बारबाडोसमधील दुसऱ्या वनडेतील पराभवाबाबत चर्चा केली. मी म्हणालो होतो की भारतीय संघाला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना वर्ल्डकपमध्ये कोणताही दबाव न टाकता पाठवलं पाहिजे.'

'याबाबत जास्तीजास्त लोकं सहमत होते. मात्र काही लोकांचे म्हणणे होते की जर टीम इंडिया जिंकली नाही तर काय होणार याबाबत आधीच काळजी घेतली जात आहे. सर्व खापर हे चाहत्यांवर फोडण्यात येणार आहे.'

चाहते कारणीभूत नाहीत

अश्विन आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की कोणीही चाहत्यांवर खापर फोडणार नाही. माझ्या मते चाहते हे संघाचे सर्वात मोठे हितचिंतक आहेत. चाहते सामन्याचे संपूर्ण चित्र पालटू शकतात. ज्यावेळी मायदेशात खेळणारा संघ चांगल्या स्थितीत असतो त्यावेळी त्यांना चाहत्यांचे मोठं समर्थन प्राप्त असतं.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

ICC Women’s World Cup 2025 Points Table: भारताच्या पोरींनी शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली, पाकिस्तानची गुणतालिकेत गोची केली

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

SCROLL FOR NEXT