Ravichandran Ashwin esakal
क्रीडा

Ravichandran Ashwin : युवराज, धोनी निवृत्त झाल्यापासून.... अश्विनने भारतीय संघाची दुखरी नस पकडली

अनिरुद्ध संकपाळ

Ravichandran Ashwin : निवडसमितीने नुकतेच आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवडसमितीने दुखापतीवर मात करणाऱ्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची संघात निवड केली असून ते भारतीय संघात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजाची भुमिका बजावतील. (Team India World Cup 2023 Squad News)

भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर कोण हा गेल्या अनेक वर्षापासूनचा मोठा प्रश्न राहिला आहे. भारताने 2011 चा वनडे वर्ल्डकप जिंकला त्यावेळी चौथ्या क्रमांकावर युवराज सिंग आणि पाचव्या क्रमांकावर महेंद्रसिंह धोनी येत होता. हे दोघे निवृत्त झाल्यापासून त्यांची जागा भरून काढणारे असे खेळाडू टीम इंडियाला मिळालेले नाही. याबाबत अश्विनने आपले मत व्यक्त केले.

अश्विन आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'युवराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनी निवृत्त झाल्यापासून भारतीय संघ त्यांची रिप्लेसमेंट शोधतोय. केएल राहुल ती जागा भरून काढतोय. तो पाचव्या क्रमांकावरचा फलंदाज होऊ शकतो. तसेच तो विकेटकिपिंग देखील करतोय त्यामुळे तो आपला विकेटकिपिंग - बॅट्समन असेल.'

अश्विन पुढे म्हणाला की, 'ऋषभ पंत दुखापतग्रस्त होण्यापूर्वी केएल राहुलचे संघातील स्थान हे दुय्यम होते. आता इशान किशन दुसऱ्या विकेटकिपरची भुमिका बजावत आहे. त्याने संधीचं सोनं केलं आहे. केएल राहुलला काही निगल्स आहेत. मात्र तो पहिल्या सामन्यापूर्वी तंदुरूस्त होईल अशी अशा आहे.'

अश्विनने श्रेयस अय्यरचे देखील कौतुक केले. त्याच्या मते तो भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वात चांगला फलंदाज आहे. अश्विन म्हणाला की, 'श्रेयस अय्यर हा केएल राहुल इतकाच संघासाठी महत्वाचा आहे. भारतीय संघातील तो एक अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे.'

'तो फिरकीविरूद्ध चांगलं खेळतो. त्याने चौथ्या क्रमांकावर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. जर तो पूर्णपणे फिट असेल तर तोच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल यात शंकाच नाही.'

भारतीय संघ केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघं पूर्णपणे फिट असतील अशी आशा करत आहे. वर्ल्डकपसाठी हे दोघेही अत्यंत महत्वाचे खेळाडू आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT