Ravindra Jadaja Freakily Injured During Water Based Training Season esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : जडेजाला 'स्की-बोर्ड'ची मस्ती नडली; हे झालंच कसं? BCCI संतापले

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Fitness Update : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा आशिया कपमध्ये दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर तो त्वरित मायदेशी परतला आणि आपल्या दुखऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली. दरम्यान, आशिया कपमध्ये पहिल्या दोन सामन्यात अगदी फिट दिसणाऱ्या रविंद्र जडेजाला अचानक दुखापत कशी झाली असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविंद्र जडेजाला सामन्यादरम्यान किंवा सरावादरम्यान दुखापत झालेली नाही तर हॉटेलमध्ये एक धाडसी क्रीडाप्रकार करताना ही दुखापत झाली आहे.

भारतीय संघ दुबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होता. तेथे रविंद्र जडेजाला एक वॉटर बेस ट्रेनिंग अॅक्टिव्हिटी करण्यास सांगण्यात आले होते. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, 'रविंद्र जडेजाला या धाडसी ट्रेनिंग सेशनमध्ये एका स्की बोर्डवर स्वतःचा तोल सावरायचा होता. हा धाडसी क्रीडा प्रकार बीसीसीआयच्या ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये नाहीये. जडेजाला हे धाडस करण्याची कोणतीच गरज नव्हती. तो स्की-बोर्डवरून घसरला आणि त्याचा गुडघा दुखावला. दुखापत एवढी गंभीर होती की त्याला त्वरित शस्त्रक्रिया करावी लागली.'

आता प्रश्न असा आहे की वर्ल्डकप सारखी महत्वाची स्पर्धा तोंडावर असताना टीम इंडियातील एका महत्वाच्या खेळाडूने 'स्की बोर्ड' ट्रेनिंग सेशन करणे गरजेचे होते का? मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय जडेजाला ज्या पद्धतीने दुखापत झाली त्यावरून आधीच संतापली आहे. यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटते.

सूत्रांनी सांगितले की, 'या संपूर्ण प्रकरणात संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड इतका कसा शांत राहिला याचे देखील आश्चर्य आहे. त्याने दुखापत झाल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित केले नाही. या सर्वाचा परिपाक म्हणजे रविंद्र जडेजाशिवायच भारताला ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप खेळायला जावे लागेल असे दिसते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

SCROLL FOR NEXT