Ravindra Jadeja  Sakal
क्रीडा

Ravindra Jadeja Family Dispute : घरातला वाद चव्हाट्यावर आल्यानंतर जडेजाचे 12 वर्षापूर्वीचे ट्विट व्हायरल

Ravindra Jadeja Father : रविंद्र जडेजाचे 2012 ला केलेले ट्विट व्हायरल, नेटकऱ्यांनी केला प्रश्नाचा भडीमार

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Family Dispute : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा नुकताच कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आल्यानंतर चर्चेत आला. रविंद्र जडेजाचे वडील अनिरूद्धसिंह जडेजा यांनी दिव्य भास्कर या गुजराती वर्तमानपत्राला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी सून रिवाबा आणि रविंद्र जडेजाशी आमचा काही संबंध नाही असं वक्तव्य केलं होतं. आता रविंद्र जडेजाचे 2012 मधील एक ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

रविंद्र जडेजाचे वडील अनिरूद्धसिंह जडेजा आपल्या मुलाखतीत म्हणाले की, 'रिवाबाने माझ्या मुलावर अशी काय जादू केली आहे माहिती नाही.' दरम्यान, रविंद्र जडेजाचे एक जुने ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविंद्र जडेजाने 12 वर्षापूर्वी ट्विट केले होते की, 'जो रोज त्याच्या पालकांच्या पाया पडतो त्याला आयुष्यात दुसऱ्याचे पाय धरायची गरज लागत नाही.'

रविंद्र जडेजाच्या वडिलांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यापासून सोशल मीडिायवर लोकं रविंद्र जडेजाचे हे जुने ट्विट शेअर करत प्रश्न विचारत आहेत. जुना जड्डू कुठं गेला आता असं काय झालं?, हा जड्डू आम्हाला आवडायचा आता त्याला काय झालं. तुझ्यासारखा व्यक्ती कुटुंबाच्याविरूद्ध जाईल असं वाटलं नव्हतं. अशा प्रतिक्रिया येत आहेत.

रविंद्र जडेजाने वडिलांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला की, या मुलाखतीत काय बोललं गेलं त्याकडे लक्ष देऊ नका. हा माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे.'

जडेजा म्हणाला की, 'मुलाखतीत सांगितलेल्या गोष्टी खऱ्या नाहीत, एकतर्फी आहेत. मी सर्व आरोप फेटाळून लावतो. हा माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. मला देखील खूप काही बोलायचं आहे. मात्र मी ते सार्वजनिक ठिकाणी बोलणार नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT