Ravindra Jadeja on Kapil Dev 
क्रीडा

Ravindra Jadeja : 'तुमचा मुद्दा ठेवा पण संघात...' कपिल देवच्या वक्तव्यावर रवींद्र जडेजा संतापला

Kiran Mahanavar

Ravindra Jadeja on Kapil Dev : भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत टीम इंडियाच्या काही खेळाडूंवर अहंकारी असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाला होता की, काही खेळाडू पैशाच्या बाबतीत अहंकारी झाले आहेत. खेळाडूंना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे आणि सल्ला घेण्यासाठी ते अनुभवी व्यक्तीकडेही जात नाहीत.

यावर आता रवींद्र जडेजाने प्रत्युत्तर दिले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना जडेजा म्हणाला की, माजी खेळाडूंनी आपले मत व्यक्त केले पाहिजे, मात्र कपिलने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही.

कपिल देव यांच्या टोमणेला प्रत्युत्तर देताना जडेजा म्हणाला की, जेव्हा भारत सामना हरतो तेव्हा लोक अशा कमेंट येतात. माजी खेळाडू आपले म्हणणे ठेवू शकतात, पण मला वाटत नाही की या संघात काही अहंकार आहे. प्रत्येकजण आपापल्या क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि प्रत्येकजणी मेहनत करत आहे.

जडेजा पुढे म्हणाला की, युवा आणि अनुभव यांचा मेळ घालणारा हा चांगला संघ आहे. आम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत आहोत आणि हाच आमचा मुख्य उद्देश आहे, कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही. यापूर्वी कपिल म्हणाले होते की, मला विश्वास आहे की अनुभवी व्यक्ती मदत करू शकते. कधी कधी खूप पैसा आला की अहंकार येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

Trump Tariffs: अमेरिकेच्या 'टॅरिफ'वर मोहन भागवत पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, आम्ही असो वा नसो...

India textile export plan: ट्रम्प यांना भारतचं सडेतोड प्रत्युत्तर! आता अमेरिका वगळता ‘या’ ४० देशांशी करणार संपर्क

Bribe Case : तीस हजार रुपये लाच घेताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यास पकडले; लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT