MS Dhoni Birthday Ravindra Jadeja esakal
क्रीडा

बिनसलंय! सर्वांनी धोनीला शुभेच्छा दिल्या लाडक्या जडेजाने मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni Birthday) नुकताच त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. इंग्लंडमध्ये आपल्या कुटुंब आणि जवळच्या मित्रांनी मिळून धोनीचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. याचबरोबर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी धोनीला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांच्या वर्षावात एक गोष्ट फारशी कोणाच्या लक्षात आली नाही. धोनीचा सर्वात लाडका खेळाडू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सोशल मीडियावरून (Social Media) महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच नाहीत.

रविंद्र जडेजा यापूर्वी धोनीला सर्वात आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचा मात्र गेल्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जमध्ये जे काही नाट्य घडले त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय अशा बातम्या आल्या होत्या. ज्यावेळी रविंद्र जडेजाने आयपीएलच्या 15 व्या हंगामात मध्यावरच सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर तो सीएसकेकडून उर्वरित सामने खेळला नाही. जडेजाने नेतृत्व सोडल्यानंतर पुन्हा महेंद्रसिंह धोनी सीएसकेचा कर्णधार झाला होता.

आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर रविंद्र जडेजाने एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्याने 'आता वेगळ्या जर्सीतून नवीन सुरूवात करण्यासाठी उत्सुक' असे ट्विट केले होते. सेहवाग, रैना, हरभजन या सारख्या सर्वांनी धोनीला सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र रविंद्र जडेजाने सोशल मीडियावर धोनीला शुभेच्छा देणे टाळले. यावरून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

रविंद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्जने 2022 मेगा लिलावात रिटेन केले होते. याचबरोबर सीएसकेने त्याला 16 कोटी रूपये देऊन आपली पहिली पसंती बनवले होते. धोनीला सीएसकेने 12 कोटी रूपये देऊन रिटेन केले होते. यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी दोनच दिवस आधी सीएसकेने रविंद्र जडेजाला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले. रविंद्र जडेजाला 2012 मध्ये 9.80 कोटी देऊन सीएसकेने आपल्या गोटात खेचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT