Ravindra Jadeja Dope Test Sakal
क्रीडा

Ravindra Jadeja Dope Test : जडेजाची सर्वाधिक वेळा उत्तेजक चाचणी; `नाडा`कडून 60 पानांची यादी तयार

या कालावधीत पुरुष व महिला अशी एकूण ५५ क्रिकेटपटूंची ५८ नमुना चाचणी घेण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची सर्वाधिक उत्तेजक चाचणीत करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेकडून (नाडा) बुधवारी देण्यात आली. या वर्षी जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या अंतरात तीन वेळा त्याची चाचणी घेण्यात आली.

या कालावधीत पुरुष व महिला अशी एकूण ५५ क्रिकेटपटूंची ५८ नमुना चाचणी घेण्यात आली. नाडाकडून सर्व खेळांतील खेळाडूंच्या १५०० पेक्षा जास्त नमुना चाचण्या घेण्यात आल्या असून ६० पानांची यादीही त्यांच्याकडून तयार करण्यात आली आहे.

नाडाकडून २०२१ व २०२२ मध्ये क्रिकेटपटूंची अनुक्रमे ५४ व ६० नमुना चाचणी घेण्यात आली होती. २०२२ मध्ये महिला क्रिकेटपटूंकडून २० नमुना चाचणी घेण्यात आली. २०२१ व २०२२ मध्ये रोहित शर्माची सर्वाधिक तीन वेळा नमुना चाचणी करण्यात आली होती.

विराट कोहलीची नमुना चाचणी अद्याप घेण्यात आलेली नाही. या वर्षी पाच महिन्यांमध्ये हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना या दोन महिला क्रिकेटपटूंची प्रत्येकी एक वेळा चाचणी करण्यात आली आहे.

आयपीएलमध्ये २० नमुना चाचण्या करण्यात आल्या. क्रिकेटपटूंच्या ५८ पैकी सात नमुने रक्ताचे घेण्यात आले आहेत. ५१ नमुने हे लघवीचे आहेत.

सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, इशान किशन, मोहम्मद सिराज, दीपक चहर, मयांक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, रिद्धिमान साहा, दिनेश कार्तिक, यशस्वी जायस्वाल, अंबाती रायुडू, पियूष चावला आणि मनीष पांडे या भारतीय क्रिकेटपटूंची आणि डेव्हिड विस, डेव्हिड मिलर,

कॅमेरून ग्रीन, सुनील नारायन, आंद्रे रसेल, डेव्हिड वॉर्नर, राशीद खान, डेव्हिड विली, ट्रेंट बोल्ट, मार्कस स्टॉयनिस, मार्क वूड, अॅडम झाम्पा, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन जोफ्रा आर्चर या परदेशी क्रिकेटपटूंची नमुना चाचणी घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT