IND vs ENG 
क्रीडा

IND vs ENG : सर जडेजाची कमाल; थेट कपिल पाजींच्या पंक्तित

कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 200 विकेट्स असा खास विक्रम नोंदवत त्याने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

सुशांत जाधव

England vs India, 1st Test: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात कमालीचा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. इंग्लंडचा डाव अवघ्या 183 धावांत आटोपल्यानंतर भारताने पहिल्या डावात 278 धावा केल्या. सलामीवीर लोकेश राहुलसह रविंद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील 16 वे अर्धशतक झळकवणाऱ्या जडेजाने 2000 धावांचा टप्पाही पार केलाय. कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा आणि 200 विकेट्स असा खास विक्रम नोंदवत त्याने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

जडेजापूर्वी भारताकडून कपिल देव, आर अश्विन, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी अशी कामगिरी नोंदवली होती. कसोटीमध्ये 2000 + धावा आणि 200 विकेट असा डबल धमाका करणारा जडेजा क्रिकेट जगतातील पाचवा खेळाडू आहे. जडेजाने 53 व्या कसोटी सामन्यात मैलाचा पल्ला गाठलाय.

इंग्लंडचे माजी क्रिकेटर इयान बॉथम (Ian Botham) यांनी सर्वात जलद अशी कामगिरी करुन दाखवलीये. त्यांनी अवघ्या 42 कसोटी सामन्यात 2000 धावांसह 200 विकेट मिळवण्याचा विक्रम नोंदवला आहे. या यादीत कपिल देव दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 50 कसोटी सामन्यात हा टप्पा पार केला होता. पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार इमरान खान यांनी देखील कपिल पांजीच्या बरोबरीनं 50 कसोटीतच हा मैलाचा पल्ला गाठला होता. अश्विनने 51 कसोटी सामन्यानंतर अशी कामगिरी केली होती.

इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांत आटोपला

भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर यजमान इंग्लिश बॅट्समनची अवस्था केविलवाणी झाली. कर्णधार ज्यो रुट वगळता अन्य कोणत्याही फंलदाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणाणी इंग्लंडचा पहिला डाव 183 धावांत आटोपला. टीम इंडियाकडून बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीला 3 तर शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली.

कोहलीचा भोपळा

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. पण रोहित बाद झाल्यानंतर संघाचा डाव गडबडला. कर्णधार विराट कोहलीला जेम्स अँडरसनने खातेही उघडू दिले नाही. तो बाद झाल्यानंतर रविंद्र जडेजाने अर्धशतकी खेळी करुन डाव सावरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT