Ravindra Jadeja esakal
क्रीडा

IPL कॅप्टन्सी गमावल्यानंतर जडेजा ऍक्शनमोडमध्ये; इंग्लंडला पोहोचताच ट्विट...

स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतीय कसोटी संघासह इंग्लंडला पोहोचला

धनश्री ओतारी

स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतीय कसोटी संघासह इंग्लंडला पोहोचला असून तो १ जुलैपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय कसोटीच्या तयारीला लागला आहे. दरम्यान, 33 वर्षीय जडेजाने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे आयपीएल कॅप्टन्सी गमावल्यानंतर जडेजा पहिल्यांदाच अॅक्शनमोडमध्ये दिसला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, मोहम्मद शमी सारखे खेळाडू दाखल झाले आहेत. अशातच, मे महिन्यानंतर प्रथमच मैदानात उतरण्यापूर्वी रवींद्र जडेजाने एक फोटो शेअर करत ट्विट केले पण त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

जडेजाने टीम इंडियाच्या जर्सीमधील एक फोटो शेअर केला आहे. आणि 'दुसऱ्या जर्सीमध्ये नवीन सुरुवात करण्यावर लक्ष केंद्रित.' असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून रवींद्र जडेजाचा पहिला कार्यकाळ खराब ठरला. त्याच्या कॅप्टन्सी काळात संघाला 8 पैकी 6 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याने 8 सामन्यांनंतर कर्णधारपद गमावले आणि एमएस धोनीने पुन्हा एकदा संघाची जबाबदारी घेतली. मात्र, दोन सामन्यांनंतर दुखापतीमुळे रवींद्र जडेजा उर्वरित मोसमातून बाहेर पडला होता.

आयपीएल 2022 मध्ये, जडेजाने 10 सामन्यात 116 धावा केल्या आणि पाच विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंड 7 ते 17 जुलै दरम्यान भारताला 3 टी-20 आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. इंग्लंड मालिकेनंतर, मेन इन ब्लू 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचा दौरा करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

SCROLL FOR NEXT