Ravindra Jadeja Ranji Trophy esakal
क्रीडा

Ravindra Jadeja : आधी रणजी ट्रॉफी खेळा! बीसीसीआने रविंद्र जडेजाला दिले आदेश

अनिरुद्ध संकपाळ

Ravindra Jadeja Ranji Trophy : भारतीय निवडसमितीने नुकतेच ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. निवडसमितीने दुखापतीतून सावरत असलेल्या रविंद्र जडेजाचा संघात समावेश केला आहे. मात्र याचबरोबर टीम लिहिली की जडेजाचा संघातील समावेश हा त्याचा फिटनेस पाहून केली जाईल.

यामुळे बीसीसीआयला अजूनही रविंद्र जडेजा पूर्णपेणे फिट झाला आहे की नाही याबाबत शंका असल्याचे दिसून येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एनसीएने रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह दोघेही फिट असल्याची घोषणा केली होती. मात्र ऐनवेळी बुमराहने माघार घेतली. हे दोघेही एनसीएमध्ये रिहॅब करत आहेत.

रविंद्र जडेजा फिट आहे की नाही याबाबत साशंकतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता बीसीसीआयने रविंद्र जडेजाला रणजी ट्रॉफी खेळण्याचे आदेश दिले आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात रविंद्र जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो टी 20 वर्ल्डकपला देखील मुकला होता.

आता निवडसमितीने त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या संघात घेतले आहे. एनसीएने त्याच्या फिटनेसबाबत निर्वाळा दिल्याशिवाय त्याचा समावेश झाला नसता. मात्र तरी देखील निवडसमितीने रविंद्र जडेजाला रणजी ट्रॉफीत खेळण्यास सांगितले आहे. ही जडेजाची एक प्रकारे फिटनेस टेस्टच असेल. जडेजाला रणजी ट्रॉफीत आपला मॅच फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Patkar: ''मला अर्ज भरु दिला नाही'', अभिनेता विजय पाटकर यांचे मंत्र्याच्या ओएसडींवर गंभीर आरोप

Air India Building: एअर इंडिया इमारत सरकार खरेदी करणार; डील लवकरच पूर्ण होणार, कारण काय?

Mumbai Bengaluru Express Railway : मुंबई -बंगळूर सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणेकरांना जलद सेवा, असे असेल वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन; राज्यभरात राजकीय वातावरण तापलं

Instagram Teleprompter Feature: आता Reels बनवणं होणार अगदी सोपं! Instagramचं नवं फीचर चर्चेत; 'असं' वापरलं तर झटपट वाढतील फॉलोवर्स

SCROLL FOR NEXT