IND vs BAN Sai Kishore  esakal
क्रीडा

IND vs BAN : पहिल्या सामन्यात भावनिक झालेल्या साई किशोरचा दुसऱ्या सामन्यात धमाका, टीम ऋतुराजची रौप्य पदकावर मजबूत पकड

अनिरुद्ध संकपाळ

India vs Bangladesh Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 मधील पुरूष क्रिकेट सेमी फायलनमध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या भारताने बांगलादेशला 100 च्या आज गुंडळून सामन्यावर आपली मजबूत पकड निर्माण केली.

भारताकडून युवा डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोरने भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. बांगलादेशला 20 षटकात 9 बाद 96 धावांपर्यंतच मजल मारता आली.

एशियन गेम्समध्ये भारताला क्वार्टर फायनल सामन्यात नेपाळने चांगलीच टक्कर दिली होती. भारताने 202 धावा करून देखील भारताला फक्त 23 धावांनीच सामना जिंकता आला होता. नेपाळने 179 धावांपर्यंत मजल मारत भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती.

मात्र सेमी फायनल सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत बांगलादेशला 20 षटकात 96 धावांमध्ये रोखले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने बांगलादेशची अवस्था 5 बाद 45 धावा अशी केली होती.

भारताच्या फिरकी गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये प्रभावी मारा करत बांगलादेशच्या फलंदाजीला भगदाड पाडले. साई किशोर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशला सुरूवातीचे धक्के दिले. त्यानंतर भारताचा पार्ट टाईम गोलंदाज तिलक वर्माने देखील गोलंदाजीत आपले योगदान दिले.

बांगलादेशकडून परवेज हुसैन इमोन (23), जाकेर अली (24) आणि राकिबुल हसनलाच (14) दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून साई किशोरने सर्वाधिक 3 तर वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट्स घेतल्या. त्यांना तिलक वर्मा, रवि बिश्नोई, शाहबाज अहमद आणि अर्शदीप सिंह यांची प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT