Virat Kohli - Anushka Sharma File photo
क्रीडा

'...तेव्हा वामिकाचा चेहरा दाखवणार'; विराटचं चाहत्याला उत्तर

विराटने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. अनेकांनी विराटचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

आशिष कदम

विराटने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. अनेकांनी विराटचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या वर्षी आई-बाबा बनले. या वर्षाच्या सुरवातीलाच विरुष्का जोडीने मुलगी झाल्याची गुड न्यूज दिली. त्यानंतर ते वारंवार चर्चेत राहिले. विरुष्काच्या मुलीला पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत. एका चाहत्याने विराटला मुलीचा चेहरा कधी दाखवणार असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विराटने इन्स्टाग्राम सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

वामिका हे दुर्गा देवीचं नाव

विराटला एका फॅनने प्रश्न विचारला की, वामिका याचा अर्थ काय होतो? ती कशी आहे? आणि मी तिला पाहू शकतो का? तेव्हा विराट म्हणाला की, 'वामिका हे दुर्गा देवीचं दुसरं नाव आहे. वामिकाला जोपर्यंत सोशल मीडियाची समज येत नाही, आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय हे तिला समजत नाही, तोपर्यंत तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.'

विराटने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. काहीजणांनी विराटचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. विराट आणि अनुष्का यांनी २०१७मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांना कन्यारत्न झाले. विरुष्काला कन्यारत्न होणार अशी भविष्यवाणी बंगळुरूमधील एका ज्योतिषाने केली होती. ती खरी ठरली. विराटच नव्हे तर अनुष्कानेही आपल्या मुलीचा चेहरा न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी खासगी आयुष्यात माध्यमांनी ढवळाढवळ करू नये, असे आवाहनही केले होते.

दरम्यान, विराटसह टीम इंडियातील अनेक खेळाडू हे सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन आहेत. विराट सेना पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान साउथम्प्टन मैदानात हा सामना रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

क्रीडा विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT