Bahrain women's national cricket team
Bahrain women's national cricket team Sakal
क्रीडा

टी-20 I मध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम; दीपिकानंही रचला इतिहास

सकाळ डिजिटल टीम

जीसीसी वुमन्स टी 20 चॅम्पियनशिप स्पर्धेतील सातव्या सामन्यात टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (International Cricket)अनेक विक्रम मोडीत निघले. 22 मार्च 2022 रोजी ओमानच्या अल अमीरात क्रिकेट ग्राउंड ओमान क्रिकेट (मिनिस्ट्री टर्फ 2) च्या मैदानात सौदी अरब आणि बहरीन महिला संघात सामना रंगला होता. सौदी अरब संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बहरीन संघाने (Bahrain women's national cricket team) निर्धारित 20 षटकात एक विकेटच्या मोबदल्यात 318 धावा कुटल्या.

पुरुष आणि महिला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम हा यूगांडा महिला संघाच्या नावे होता. यूगांडा संघाने 20 जून 2019 मद्ये माली विरुद्धच्या लढतीत निर्धारित 20 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात 314 धावा केल्या होत्या. पुरुष टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम हा अफगाणिस्तानच्या नावे आहे. 23 फेब्रुवारी 2019 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने निर्धारित 20 षटकात 3 बाद 278 धावा केल्या होत्या.

बहरीन आणि सऊदी अरब यांच्यातील सामन्यात बहरीनची बॅटर दीपिका रसंगिका हिने नाबाद 161 धावांची खेळी केली. तिने 66 चेंडूत 31 चौकार खेचले. कर्णधार थरंगा गजानायके (Tharanga Gajanayake) हिने 17 चौकाराच्या मदतीने 56 चेंडूत 94 धावांची खेळी केली. दीपिका रसंगिका हिने महिला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 पेक्षा अधिक धावा करणारी पहिली बॅटर ठरली आहे.

कोलंबोमध्ये 13 डिसेंबर 1983 मध्ये जन्मलेल्या दीपिका रसंगिका (Deepika Rasangika) 2008 ते 2014 या कालावधीत श्रीलंका संघाकडूनही खेळली आहे. दीपिका आधी महिला टी20 मध्य सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हीली हिच्या नावे होता. 2 आक्टोबर 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिने नाबाद 148 धावांची खेळी केली होती. पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोघांनी 150 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. फिंचने 3 जुलै 2018 मध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात 172 धावांची खेळी केली होती. या यादीत दुसऱ्या स्थानावर अफगानिस्तानचा हजरतउल्लाह झजाई आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध नाबाद 162 धावांची खेळी केली होती. फिंचने इंग्लंडविरुद्ध 156 धावांची खेळी देखील केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT