Sports players sakal
क्रीडा

International Players : आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दिलासा; प्रोत्साहनपर पारितोषिकाच्या निकषात बदल

आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना राज्य शासन प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करते.

सकाळ वृत्तसेवा

सातारा - आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना राज्य शासन प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करते. या स्पर्धांमध्ये उज्ज्वल कामगिरी करून देखील एखादा खेळाडू पात्रतेच्या निकषामुळे प्रोत्साहनपर पारितोषिकापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने नुकतेच पात्रता निकषांमध्ये नवीन सुधारणा केली आहे.

राज्य शासनाने पात्रतेच्या निकषांमध्ये काही नियमांचा ऑक्टोबर २०१८ मध्ये नव्याने समावेश केला होता. या निकषांमध्ये पुन्हा जुलै २०२४ मध्ये अंशतः बदल केला आहे. यामध्ये सर्व स्पर्धेतील सांघिक स्पर्धा असल्यास आठ देशांचे संघ असणे आवश्‍यक आहे, तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात आठ देशांचे खेळाडू संबंधित खेळ प्रकाराच्या स्पर्धेत, वयोगटात सहभागी असणे आवश्‍यक आहे.

तथापि ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा या स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर पारितोषिक रक्कम देताना सांघिक, वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभागी संघांची, देशाची अट आवश्‍यक असणार नाही, असे नव्या अध्यादेशात नमूद केले आहे.

नव्या नियमामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत एखाद्या खेळाडूने उज्ज्वल कामगिरी केल्यास त्याला प्रोत्साहनपर पारितोषिक मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT