Resignation of Sports Minister Sandeep Singh esakal
क्रीडा

Sports Minister : आधी केली मैत्री, नंतर दिली प्रेयसी बनण्याची ऑफर; विनयभंगाचा आरोप होताच क्रीडामंत्र्यांचा राजीनामा

क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्यावर एका महिला प्रशिक्षकानं लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

क्रीडामंत्री संदीप सिंह यांच्यावर एका महिला प्रशिक्षकानं लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

Resignation of Sports Minister Sandeep Singh : हरियाणा राज्याचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडं आपला राजीनामा सुपूर्द केलाय. संदीप सिंह यांच्यावर एका महिला प्रशिक्षकानं लैंगिक छळाचा आरोप केलाय.

आज म्हणजेच, रविवारी हरियाणा पोलिसांनंतर चंदीगड पोलिसांनी संदीप सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. संदीप सिंह यांच्यावर आयपीसी कलम 354, 354A, 354B, 342, 506 अंतर्गत चंदीगडमधील सेक्टर-26 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन महिला प्रशिक्षकानं या प्रकरणाची माहिती माध्यमांसमोर ठेवली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर हरियाणातील विरोधी पक्षांनी संदीप सिंह यांना पदावरून तत्काळ हटवण्याची मागणी केली. हरियाणा सरकारनं शनिवारी या तक्रारीवर एसआयटी स्थापन केलीये. एसआयटी या प्रकरणाची हरियाणामध्ये चौकशी करणार आहे.

महिला प्रशिक्षकानं काय केलेत आरोप?

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत महिला प्रशिक्षकानं विनयभंगाच्या घटनेची तारीख 1 जुलै 2022 दिली आहे. मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ते सुखना तलावापर्यंत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलीये. महिला प्रशिक्षकाचा आरोप आहे की, 'नोकरी मिळण्याआधीच क्रीडामंत्र्यांनी मला आधी मैत्री करायला सांगितलं आणि नंतर प्रेयसी बनण्याची ऑफर दिली.'

मोबाईलची करणार तपासणी

स्नॅप चॅट आणि इन्स्टाग्रामवर क्रीडामंत्री मला मेसेज पाठवत होते, असा त्यांचा आरोप आहे. याबाबतचे सबळ पुरावे आपल्याकडं असून पोलीस तपासात ते सादर करणार असल्याचंही महिला प्रशिक्षकानं सांगितलं. मंत्री आणि त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करून डिलीट केलेले मेसेज परत मिळवावेत, यातून संपूर्ण सत्य समोर येईल, अशी मागणी महिला प्रशिक्षकानं केलीये. यासंदर्भात ती राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांचीही भेट घेणार असल्याचं तिनं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pachod News : पोळ्याच्या आनंदावर दुष्काळाचे विरजण..! बैलांना आंघोळ घालायलाही नाही पाणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चार युवक पाण्याच्या टाकीवर; सरकारच्या भूमिकेविरोधात संताप

Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

त्यांच्या मिसेस आमच्यासाठी चहा घेऊन आल्या... सचिन तेंडुलकरांच्या पाहुणचाराने भारावलेला निलेश साबळे; म्हणाला- जेव्हा ते आले...

SCROLL FOR NEXT