Rhythm Sangwan
Rhythm Sangwan  sakal
क्रीडा

Rhythm Sangwan : सरबज्योत-दिव्याचा सुवर्णवेध

सकाळ डिजिटल टीम

बाकू (अझरबैझान) - भारताने बाकू येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये दुसरे पदक पटकावले. ऱ्हिदम सांगवान हिने बुधवारी भारताला पहिले पदक जिंकून दिले होते. आता सरबज्योत सिंग व दिव्या टी. एस. या जोडीने गुरुवारी भारताच्या पदकसंख्येत भर घातली. सरबज्योत सिंग व दिव्या टी. एस. या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला.

सरबज्योत-दिव्या या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकाराच्या पात्रता फेरीत ५८१ गुणांची कमाई करीत पहिला क्रमांक पटकावला. याच प्रकारात वरुण तोमर आणि ईशा सिंग या भारतीय जोडीला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

त्यांचे ब्राँझपदक थोडक्यासाठी हुकले. सरबज्योत-दिव्या जोडीने सुवर्णपदकासाठीच्या लढतीत दामिर मिकेच-झोराना अरुणोविच या सर्बीयाच्या जोडीवर १६-१४ असा विजय साकारला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. मिकेच-झोराना यांनी रौप्यपदक पटकावले. इस्माईल केलेस-सायमल यिलमाझ या तुर्कीच्या जोडीला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

१० मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात निराशा

१० मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात भारतीय खेळाडूंकडून निराशा झाली. तिलोत्तमा सेन-हृदय हझारिका या जोडीची ६२७.६ गुणांसह १७ व्या स्थानावर घसरण झाली. रमिता व रुद्रांक्ष पाटील या जोडीचीही ६२६.३ गुणांसह २८ व्या स्थानावर घसरगुंडी उडाली. या प्रकारात पहिल्या दोन स्थानांवर चीनच्या खेळाडूंनी बाजी मारली. झेक प्रजासत्ताकच्या जोडीने ब्राँझपदकाची कमाई केली.

पदकतालिकेत दुसरे स्थान

जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांच्या निकालानंतर भारतीय संघ दोन पदकांनिशी दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. भारताने एक सुवर्ण व एक ब्राँझ अशी दोन पदके पटकाविली आहेत. चीनने एक सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक अशी दोन पदके जिंकत पहिले स्थान कायम ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT