Ricky Ponting Prediction Of T20 World Cup Which Will Be played In Australia In October esakal
क्रीडा

Ricky Ponting : पॉटिंगच्या मते टी 20 वर्ल्डकपचे 'हे' असतील फायनलिस्ट

अनिरुद्ध संकपाळ

Ricky Ponting : यंदाचा टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियात (Australia) ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात होत आहे. विशेष म्हणजे युएईमध्ये गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकपची ऑस्ट्रेलिया गतविजेती असल्यांने आता होम ग्राऊंडवर ते आपले टायटल डिफेंड करणार आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग (Ricky Ponting) यांनी दोन संघ ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपमध्ये फायनलपर्यंत पोहचतील असे भाकित केले आहे.

रिकी पॉटिंग आयसीसी रिव्हू मध्ये बोलताना म्हणाला की, 'मला असे वाटते की भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia Vs India) हे दोन संघ यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये फायनलपर्यंत पोहचतील. मी फक्त इतकेच सांगू शकतो की ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये भारताला पराभूत करेल. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आपले टायटल डिफेंड नक्की करतील. गेल्या वर्ल्डकपमध्ये ते घरच्या मैदानावर खेळले नव्हते. मात्र यंदा ते घरच्या मैदानावर खेळणार आहे.'

पॉटिंग पुढे म्हणाला, 'खरं तर अनेक माझ्या बरोबरच अनेक लोकांना ऑस्ट्रेलिया जेव्हा युएईमध्ये गेली होती त्यावेळी तेथील परिस्थिती ऑस्ट्रेलियाला साथ देणार नाही त्यामुळे ते जिंकू शकणार नाहीत असं वाटत होतं. मात्र त्यांनी यातूनही मार्ग काढत वर्ल्डकप जिंकला.' इंग्लंडबद्दल पॉटिंग म्हणाला, 'मला असे वाटते की इंग्लंड ही मर्यादित षटकातील एक चांगली टीम आहे. त्यांच्याकडे मर्यादित षटकातील सर्वात चागंला संघ आहे. माझ्या मते भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या कागदावर तरी तगडे संघ दिसतात.'

पॉटिंग पाकिस्तानबद्दल देखील बोलला. तो म्हणाला की, 'जर बाबरला स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही तर मला नाही वाटत की पाकिस्तान जिंकले. तो ज्यावेळी काही वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळला होता त्यावेळी या खेळाडूमध्ये क्षमता आहे. पाकिस्तानचे सलामीवीर आणि नवा चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्वाचे आहेत. पण, फिरकीपटूंना ऑस्ट्रेलियात फारशी साथ मिळण्याची शक्यता नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

९-१० तास काम, ओव्हटाइम नाही, दिवसाला ६५० रुपयेच मिळतात; PMPLच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, VIDEO VIRAL

धर्मस्थळ प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेने केला धक्कादायक खुलासा; 'त्या' पुरलेल्या 100 हून अधिक मृतदेहांचे सत्य उलगडणार?

Anil Ambani: अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या! ED नंतर मुंबईत CBIचा छापा; काय आहे 2,000 कोटींच प्रकरण?

ती प्राजक्ता नाहीच! गोविंदा आणि सुनीताच्या चर्चित घटस्फोटामुळे मराठी अभिनेत्रींची का सुरू आहे बदनामी?

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

SCROLL FOR NEXT