Rinku Singh Team India Selection esakal
क्रीडा

Rinku Singh : टीम इंडियाचे दार उघडल्यावर रिंकूने दिली एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

Rinku Singh Team India Selection : एशियन गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाल्याचे ऐकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फिनिशर रिंकू सिंह चंद्रावरच पोहचला होता. भारताचा वरिष्ठ संघ मायेदशात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. याच दरम्यान एशियन गेम्स होत असल्याने बीसीसीआयने यासाठी आपला युवा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला.

बीसीसीआयने 14 जुलैला या संघाची घोषणा केली. यात गेल्या आयपीएल हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंहचा (Rinku Singh News) देखील समावेश आहे. या संघाचे नेतृत्व चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड करणार आहे.

रिंकू सिंहला वेस्ट इंडीजमधील टी 20 मालिकेत संधी मिळेल अशी जोरदार चर्चा होती. मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.

आता त्याची निवड एशियन गेम्ससाठी झाली असून अखेर त्याला भारताची कॅप घालण्याची संधी मिळणार आहे. यानंतर रिंकू सिंहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला भावना व्यक्त केल्या. त्याने आपली आयपीएल फ्रेंचायजी केकेआरचीच पोस्ट शेअर केली.

या पोस्टमधील फोटोमध्ये रिंकू सिंह केकेआरचे किट घातलेला रिंकू सिंह टीम इंडियाची जर्सी घातलेल्या रिंकू सिंह एकमेकांसमोर उभे आहेत. या फोटो मध्ये अखेर असा एकच शब्द लिहिलेला आहे. (Cricket News In Marathi)

रिंकूसाठी आयपीएलचा गेला हंगाम दमदार गेला होता. त्याने केकेआरसाठी मॅच फिनिशरची भुमिका निभावत 474 धावा केल्या. मात्र त्याच्या संघाला फारशी मोठी मजल मारता आली नाही. भारतीय पुरूष संघ पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा चीनमध्ये होणार असून यासाठी भारतीय महिला संघ देखील जाणार आहे.

भारताचा पुरूष संघ :

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग.

स्टँड बाय खेळाडू :

यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT