Rinku Singh  esakal
क्रीडा

Rinku Singh Video : 6, 6, 6... आता रिंकूची सुपर ओव्हरमध्ये 'सुपरकूल' कामगिरी

अनिरुद्ध संकपाळ

Rinku Singh Video : भारताचा उगवता तारा रिंकू सिंहने नुकतेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे. त्याने आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलं. रिंकूने आयपीएलमध्ये 5 षटकार मारत सामना जिंकून दिला होता. आता असाच कारनामा त्याने उत्तर प्रदेश लीगमध्ये केला आहे. मात्र रिंकूने यावेळी हा कारनामा सुपर ओव्हरमध्ये केला. त्याने सलग तीन षटकार मारत मेरठचा विजय खेचून आणला.

रिंकू सिंहच्या या कामगिरीमुळे तो संघासाठी मॅचफिनिशरची भुमिका चोखपणे निभावू शकतो याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

उत्तर प्रदेश प्रीमियर लीगमध्ये मेरठकडून खेळणाऱ्या रिंकू सिंहने काशी रूद्रांश संघाविरूद्ध षटकारांची हॅट्ट्रिक केली. मेरठला सुपर ओव्हरमध्ये विजयसाठी 17 धावांची गरज होती. रिंकू सिंहने सलग तीन चेंडूत तीन षटकार मारत सामना खिशात टाकला. यानंतर संघ सहकाऱ्यांनी त्याला खांद्यावर घेत जल्लोष केला.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मेरठ मारविक्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेट्स गमावून 181 धावा केल्या होत्या. मेरठकडून माधव कौशिकने 52 चेंडूत 87 धावांची आक्रमक खेळी केली. यात 9 चौकार आणि 4 षटकार मारले होते. रिंकूने 22 चेंडूत 15 धावा केल्या होत्या.

काशी रूद्राने विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना 20 षटकात 7 बाद 181 धावा केल्या. सामना टाय झाल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये काशीच्या संघाने एका षटकात 16 धावा केल्या होत्या. मेरठसमोर विजयासाठी 17 धावांची गरज होती. काशीच्या करण शर्माने 5 चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारत 10 धावा केल्या होत्या. तर शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शरीमने षटकार मारत मेरठसमोर विजयासाठी 17 धावांचे आव्हान ठेवले होते.

हे आव्हान पार करण्यासाठी मेरठकडून रिंकू सिंह आणि दिव्यांश मैदानावर उतरले. स्ट्राईक रिंकू सिंहने आपल्याजवळच ठेवले होते. त्याने पहिला चेंडू निर्धाव घालवला. मात्र पुढच्या तीन चेंडूवर त्याने सलग तीन षटकार मारत सामना 4 चेंडूतच जिंकून दिला. रिंकूने केकेआरने गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात एका षटकात 5 षटकार मारत विजय मिळवून दिला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT