IND vs SA 1st Test Sakal
क्रीडा

IND vs SA 1st Test : कसोटी सामन्यात रिंकू सिंगची एंट्री; दिसला मैदानात, काय होतं कारण?

उपशीर्षक: रिंकू सिंगच्या क्षेत्ररक्षणाने चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Kiran Mahanavar

IND vs SA 1st Test : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाच्या कसोटी मालिकेची सर्वांनाच प्रतीक्षा होती. कारण आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह प्रथमच मैदानात उतरणार होते.

सेंच्युरियनमधील बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप दिसले. आणि संपूर्ण संघ पहिल्या डावात 245 धावांत गारद झाला. केएल राहुलच्या शतकाशिवाय या सामन्यात काही चांगलं घडलं नाही. पण आणखी एक गोष्ट घडली ज्यामुळे चाहत्यांना आनंद झाला. टी-20 स्टार रिंकू सिंग दुसऱ्या दिवसाच्या खेळात क्षेत्ररक्षण करताना दिसला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुस-या दिवशी असे काही पाहायला मिळाले, ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. सेंच्युरियन कसोटी सामन्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेदरम्यान षटकार ठोकणारा रिंकू सिंग मैदानात उतरला. 30 व्या षटकात गोलंदाजी करताना रिंकू सिंग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण करताना दिसला. तो पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात आला होता.

आयसीसीचे नियम काय सांगतात?

आयसीसीच्या नियमांनुसार, कोणताही संघ कसोटी सामन्यादरम्यान पर्यायी संघाच्या लिस्टमध्ये जास्तीत जास्त 6 खेळाडूंना नामनिर्देशित करू शकतो. ज्या खेळाडूंची नावे त्यावर नमूद केली आहेत ते दुखापतग्रस्त किंवा विश्रांती दिलेल्या खेळाडूच्या जागी सामन्यादरम्यान मैदानात उतरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT