Rishabh Pant Accident sakal
क्रीडा

Rishabh Pant Accident: तीन दिवसात 5737 किलोमीटर प्रवास अन् रात्रीची ड्रायव्हिंग पंतला भोवलं...

Kiran Mahanavar

Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या लाखो चाहत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. यासगळ्यात अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला ज्यात ते थोडक्यात बचावले. अपघाताच्या काही वेळापूर्वी पंतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो काम करताना दिसत होता. तो दुबईत माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत होता जिथे त्यांनी पार्टी केली. बांगलादेश दौऱ्यावरून पंत थेट दुबईला पोहोचला होता.

बांगलादेश मालिकेनंतर ऋषभ पंत 3543 किलोमीटर प्रवास करुन थेट दुबईला पोहोचला. दुबईमध्ये एमएस धोनी आणि साक्षी धोनी यांच्यासोबत खास पद्धतीने ख्रिसमस साजरा केला. धोनीसोबत पार्टी झाल्यानंतर पंत दिल्लीला रवाना झाला. दुबई वरून दिल्लीला 219 किलोमीटरचा प्रवास पंतने काल केला.

तीन दिवसात पंतने 5737 किलोमीटर प्रवास केला. ऋषभ पंतला त्याच्या आईला सरप्राईज करायचे होते. त्यामुळे रात्री उशिरा तो दिल्लीहून रुरकीच्या दिशेने त्यांच्या कारमधून एकटाच निघाला होता, आणि दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला आहे.

क्रिकेटपटू ऋषभ पंतला रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारानंतर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. अहवालावर विश्वास ठेवला तर त्याच्या जीवाला कोणताही धोका नसून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताचे अनेक फोटो आणि फोटो व्हायरल होत आहेत. धोनीसोबत वेळ घालवून भारतात परतताच त्याच्यासोबत ही घटना घडली.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने भारतीय संघाची धुरा सांभाळत 94 धावांची खेळी केली. भारताला मजबूत स्थितीत आणले. पंतची ही खेळी भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची ठरली. ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने स्वत:ला सिद्ध केले आहे, मात्र टी-20 मध्ये त्याला तशी छाप पाडता आलेली नाही. ऋषभ पंतच्या टी-20 कारकिर्दीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT