Rishabh Pant IPL 2023 sakal
क्रीडा

Rishabh Pant: IPL 2023 मध्ये पंत मैदानाबाहेरच! सौरव गांगुलीने दिला दुजोरा

दिल्ली कॅपिटल्सला शोधवा लागणार ऋषभचा रिप्लेसमेंट!

Kiran Mahanavar

Rishabh Pant OUT of IPL 2023 : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा 30 डिसेंबरला भीषण अपघात झाला. दिल्लीहून तो रुरकी येथील त्यांच्या घरी जात होता. डेहराडूनमध्ये प्राथमिक उपचारानंतर बीसीसीआयने त्याला मुंबईला हलवले.

ऋषभ पंतच्या उजव्या पायाच्या लिगामेंटवर 6 जानेवारीला यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला मैदानात परतण्यासाठी 6 महिने लागू शकतात, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत त्याच्या आयपीएल 2023 मध्ये खेळण्याबाबत साशंकता होती. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता पंत आयपीएलमध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट केले आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी सांगितले की ऋषभ पंत आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही. कोलकात्यात माध्यमांशी बोलताना गांगुली म्हणाले की, पंतला सावरायला वेळ लागणार आहे. ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्समध्ये फरक पडेल. त्याच्या गैरहजेरीत दिल्लीचा कर्णधार कोण असेल या प्रश्नावर ते म्हणाले, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत लवकरच घोषणा होणार आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर तीन महिन्यांनी सौरव गांगुली क्रिकेटमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांना त्यांच्या संघाचे क्रिकेट संचालक बनवले आहे. गांगुली 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक देखील होता. त्यानंतर ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT