Rishabh Pant Date Of Birth  esakal
क्रीडा

Rishabh Pant Date Of Birth : पंतने बदलली आपली जन्म तारीख; साजरे करणार दोन वाढदिवस?

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant Date Of Birth : भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत सध्या बंगळुरूच्या एनसीए क्रिकेट अकॅडमीत दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. 30 डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्यातील तीन लिगामेंटला इजा झाली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता तो एनसीएमध्ये फिट होण्यासाठी दिवस - रात्र घाम गाळत आहे.

याचदरम्यान ऋषभ पंतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमधील बायोमध्ये मोठा बदल केला आहे. ऋषभ पंतचा जन्म हा 4 ऑक्टोबर 1997 ला उत्तराखंड येथील रूरकी येथे झाला होता. मात्र आता त्याने आपली अजून एक जन्मतारीख सोशल मीडियावरील अकाऊंटवर लिहिली आहे. त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर 1 जानेवारी 2023 या आपल्या दुसऱ्या जन्मतारखेचा उल्लेख केला आहे.

ऋषभ पंतच्या गाडीला 30 डिसेंबरला पहाटे 5.30 ला रूरकी नारसन बॉर्डरवर हम्मदपूर जवळ अपघात झाला होता. त्यावेळी पंतची गाडी रेलिंगला धडकली. यानंतर गाडीला आग लागली होती. काही प्रत्यक्षदर्शींनी पंतला गाडीतून बाहेर येण्यास मदत केली होती.

या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला सुरूवातीला देहरादूनच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याला एअरलिफ्ट करून मुंबईला आणण्यात आले. त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. आता तो एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन करत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT