Rishabh Pant-Urvashi Rautela sakal
क्रीडा

Pant-Urvashi : भांडण मिटलं? उर्वशीने फ्लाइंग KISS देत केलं पंतला बर्थडे विश

उर्वशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Kiran Mahanavar

Rishabh Pant-Urvashi Rautela : भारताचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आज 25 वर्षांचा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्याला बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या. चाहते त्याच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत, त्याचवेळी उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची जोरदार चर्चा होत आहे. ईशाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांची अलीकडच्या काळात बरीच चर्चा होत आहे. दोघांनीही एकमेकांबद्दल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काहीतरी बोलले आहे. उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये हॅपी बर्थडे लिहिले आहे. त्याने कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र ते केवळ पंतचेच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओमध्ये उर्वशी फ्लाइंग किस देताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची जोरदार चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी उर्वशीने वादग्रस्त विधान केले होते, मिस्टर आरपी (आरपी), 'छोटू भैया' असे संबोधले होते. यानंतर उर्वशी आशिया मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानही स्टेडियममध्ये दिसली होती. दुसरीकडे, ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पंतांच्या वेगवेगळ्या फोटो एकत्र करून बनवला आहे. ईशाने शुभेच्छा देताना लिहिले की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT