rishabh pant back video goes viral of star cricketer batting in practice match  sakal
क्रीडा

Rishabh Pant : रिषभ पंतकडून काही चेंडू फलंदाजी अन् टोलेबाजीही

रिषभ पंत मैदानावर कधी परतणार? भारतीय क्रिकेटप्रेमींनाही लागलेली ही उत्सुकता लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : रिषभ पंत मैदानावर कधी परतणार? भारतीय क्रिकेटप्रेमींनाही लागलेली ही उत्सुकता लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर पंतने स्वातंत्रदिनाच्या दिवशी मैदानावर उतरून काही चेंडू फलंदाजी केली. पुढे सरसावत स्वतःच्या खास ठेवणीतील उंच फटकेही मारले.

गेल्या डिसेंबर महिन्यातील जीवघेण्या अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलेला पंत बरा झाला आहे, आता तो पुन्हा खेळण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. पंतचे प्रायोजक आणि आयपीएलमधील त्याच्या दिल्ली संघाचे मालक असलेल्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या फौंडेशनने स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे एक सामना झाला. त्यात पंतने काही चेंडू फलंदाजी केली.

पॅड, ग्लोव्हज अशा तयारीसह पंत मैदानाला नमन करून मैदानावर आला. फलंदाजीसाठी गार्ड घेतले. त्यानंतर त्याने पुढे सरसरावत काही फटके मारले. हे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडले. अपघातातून पंत बरा होत असला, तरी त्याच्या गुडघ्याला झालेली जबर दुखापत अजून पूर्णपणे बरी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT