Rishabh Pant  Sakal
क्रीडा

पंतची विक्रमी फिफ्टी; कपिल पाजींना टाकले मागे

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संघाचा विकेट किपर बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant )बंगळुरुच्या मैदानात आक्रमक अंदाजात फंलदाजी केली. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात त्याने 28 चेंडूत अर्धशतक झळकावले. भारतीय संघाने (Team India) श्रीलंकेला पहिल्या डावात 109 धावांत गुंडाळून दुसऱ्या डावाला सुरुवात केली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. कसोटी सामन्यात भारताकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आता पंतच्या नावे झालाय. त्याने 40 वर्षांपासून अबाधित असलेले कपिल देव यांचा विक्रम मागे टाकला.

भारतीय संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल पाजींनी कसोटी सामन्यात 30 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. 1982 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावरील कराची कसोटीत कपिल देव यांनी आक्रमक फलंदाजी केली होती. हा सामना भारतीय संघाने एक डाव आणि 86 धावांनी जिंकला होता. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पंतने या वर्षात 500 धावा करण्याचा टप्पाही पार केला. मागील दोन वर्षांत पंत आपली विशेष छाप सोडताना दिसतो. मागील 16 सामन्यात त्याने 42.37 च्या सरासरीनं 1017 धावा केल्या आहेत. यात 2 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

भारतीय संघाने बंगळुरु कसोटी सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिल्या डावात 252 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताकडून श्रेयस अय्यरने केलेली 92 धावांची खेळी सर्वोच्च ठरली होती. त्याच्यापाठोपाठ पंतने केलेल्या 39 धावांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT