Rishabh Pant Accident sakal
क्रीडा

Rishabh Pant Accident: ऋषभ पंत देणार होता आईला सरप्राइज, पण मध्येच...

रात्री उशिरा तो दिल्लीहून रुरकीच्या दिशेने त्यांच्या कारमधून एकटाच निघाला...

Kiran Mahanavar

Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघाताबाबत आता दिलासादायक बातमी आली आहे. आता तो धोक्याबाहेर आहे. रुरकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला त्याच्या आईला सरप्राईज करायचे होते. त्यामुळे रात्री उशिरा तो दिल्लीहून रुरकीच्या दिशेने त्यांच्या कारमधून एकटाच निघाला होता.

पंतला अचानक डुलकी लागली, त्यामुळे त्याचा अपघात झाला. कारमध्ये त्याच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. ड्रायव्हरही नव्हता, ऋषभ पंत स्वतः कार चालवत होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याची प्रकृती ठीक आहे, तो बोलण्याच्या स्थितीत आहे आणि धोक्याच्या बाहेर आहे. त्यांनी फक्त अपघाताची संपूर्ण माहिती दिली. पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हरिद्वार राज्याचे पोलिस अधीक्षक स्वपन किशोर यांनी सांगितले की, ऋषभ पंत यांची कार हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर आणि नरसन दरम्यान एनएच-58 वर दुभाजकावर आदळली. धडकेनंतर त्यांच्या कारला आग लागली. स्थानिक लोकांनी पंतला रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच त्यांच्या डोक्याला व पाठीवर जखमा झाल्या आहेत. ऋषभ पंतच्या मर्सिडीज कारचा क्रमांक DL 10 CN 1717 आहे, ज्यामध्ये तो अपघाताच्या वेळी प्रवास करत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणण्यात आली.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेत वाहन अपघातात जखमी झालेल्या क्रिकेटपटूवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऋषभ पंतला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT