Rishabh Pant VIDEO esakal
क्रीडा

Rishabh Pant VIDEO : पंत सेहवागवरील प्रश्नावर भडकला; हर्षा भोगलेंना म्हणतो, सर 'हा' तर...

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant VIDEO : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकल्याने मालिका देखील त्यांच्यात खिशात गेली. दरम्यान, या मालिकेत भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. ऋषभ पंतची स्फोटक फलंदाजी जितकी कसोटी क्रिकेटमध्ये जितकी प्रभावी आहे तितकी वनडे किंवा टी 20 या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नाही. दरम्यान, तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा व्यत्यय आणल्यानंतर वरिष्ठ समालोचक आणि क्रिकेट अभ्यासक हर्षा भोगले यांनी ऋषभ पंतची मुलाखत घेतली यावेळी त्याची तुलना ही विरेंद्र सेहवाग सोबत करण्याचा प्रयत्न केला. यावर ऋषभ पंतने ज्या प्रकारे उत्तर दिले ते पाहता तो जाम भडकला असल्याचे दिसून येते.

हर्षा भोगले यांनी पंतला 'मी विरेंद्र सेहवागला खूप वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला होता. आता मी तो तुला विचारतो. तुला पाहिल्यानंतर मर्यादित षटकात हा जबरदस्त फलंदाजी करू शकतो असे वाटते. मात्र तुझे तर कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड सर्वात चांगले आहे.'

या प्रश्नावर भडकलेला ऋषभ पंत म्हणाला की, 'सर तुलना करणे हा आपल्या आयुष्टाचा भागच नाहीये. आता मी 24 - 25 वर्षाचा आहे. तुम्हाला तुलना करायची असेल तर ज्यावेळी मी 30 - 32 वर्षाचा होईल त्यावेळी करा. यापूर्वी तुलना करणे बरोबर नाही.'

ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये फक्त 31 सामन्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अनेक स्मरणीय खेळी केल्या आहेत. अनेक खेळींमुळे भारताला विजय देखील मिळाला आहे. त्याची कसोटीतील धावा करण्याची सरासरी ही 43 इतकी आहे. त्याने 72 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. त्याच्याकडे कसोटी सामन्याचा नूर दोन तासात पालटण्याची क्षमता आहे.

ऋषभ पंतची वनडेची आकडेवारी पाहिली तर ती फारशी खराब नाहीये. त्याची सरासरी ही 35 आणि स्ट्राईक रेट हा 107.54 इतका आहे. त्याने इंग्लंडविरूद्ध नाबाद शतक देखील झळकावले होते. भारताने हा सामना जिंकला होता. टी 20 क्रिकेटमध्ये देखील पंतने 66 सामन्यात 126 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. मात्र तो ज्या क्रमांकावर तो फलंदाजी करतो तेथे त्याला प्रभाव पाडायला फार कमी चेंडू खेळायला मिळतात.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दाखल

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT