Rishabh Pant Hit 5 Four to David Willey in 42nd Over In England Vs India 3rd ODI esakal
क्रीडा

Rishabh Pant : पंतने विलाला दिला '4,4,4,4,4,1' असा फॅन्सी फोन नंबर

अनिरुद्ध संकपाळ

मँचेस्टर : भारताने इंग्लंड (England Vs India) विरूद्धचा तिसरा वनडे सामना पाच गडी राखून जिंकत मालिका 2 - 1 अशी जिंकली. तिसऱ्या सामन्यात भारताचा विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) हिरो ठरला. त्याने 113 चेंडूत नाबाद 125 धावा ठोकत भारताला सामना 42 षटकातच जिंकून दिला. भारताची अवस्था 3 बाद 38 धावा अशी झाली असताना त्याने हार्दिक पांड्याबरोबर (Hardik Pandya) पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. हार्दिक पांड्या 55 चेंडूत 71 धावांची आक्रमक खेळी करून बाद झाल्यानंतर पंतने तुफान फटकेबाजी करत भारताला सामना जिंकून दिला. त्याने डेव्हिड विलीला (David Willey) 42 व्या षटकात एक फॅन्सी फोन नंबरच (Fancy Phone Number) दिला.

भारताची अवस्था 3 बाद 38 धावा अशी झाली असताना क्रीजवर ऋषभ पंत आला. मुळातच आक्रमक शैलीचा पंत तिसऱ्या वनडे सामन्यात सावध खेळत होता. त्याने आपल्या फटकेबाजीच्या मोहाला नियंत्रणात ठेवत पहिल्यांदा सूर्यकुमार यादव बरोबर आणि नंतर हार्दिक पांड्याबरोबर भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करेपर्यंत दमाने घेतले. त्याच्या नंतर आलेला हार्दिक पांड्या दुसऱ्या बाजूने आक्रमक खेळी करून धावांची गती वाढवत होता. हार्दिकने तिसाव्या षटकात आपले अर्धतक पूर्ण केले. तर ऋषभ पंतने 31 व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने 71 चेंडू घेतले.

मात्र अर्धशतकानंतर त्याने आपला गिअर बदलला. ऋषभ पंतने 106 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दरम्यान, भारताला 200 चा टप्पा पार करून दिल्यानंतर हार्दिक 71 धावा करून बाद झाला. त्यानंतर पंतने भारताला विजयापर्यंत पोहचवले. त्याने 42 व्या षटकात डेव्हिड विलीला पाच चौकार मारले. त्याने विलीला 4,4,4,4,4,1 असा फॅन्सी फोन नंबरच दिला. एखाद्या गोलंदाजाला एकाच षटकात तुफान मार पडला तर क्रिकेटिंग भाषेत त्याला फोन नंबर मिळाला असे म्हणतात. पूर्वी बीएसएनएलचा लँड लाईन नंबर हा सहा अंकी असायचा याच्यावरूनच बहुदा ही मजेशीर संकल्पना रूढ झाली असावी.

ऋषभ पंतने सावध आणि आक्रमक फटक्यांचा चांगला मिलाफ करत आपली वनडेमधील पहिली वहिली शतकी खेळी साकारली. तो भारताकडून वनडेत भारतीय उपखंडाबाहेर शतकी खेळी करणारा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी राहुल द्रविड (1999), केएल राहुल (2020) यांनी अशी कामगिरी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT