Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accident sakal
क्रीडा

Rishabh Pant Accident: एक डुलकी ऋषभ पंतच संपूर्ण करिअर संपवणार?

Kiran Mahanavar

Rishabh Pant Accident : टीम इंडियाचा स्‍टार खेळाडू ऋषभ पंत शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात थोडक्यात बचावला. अपघातानंतर त्यांची कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आपला जीव वाचवण्यासाठी पंत स्वतः खिडकीच्या काचा फाडून बाहेर आला. तो दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात होते. गाडीत तो एकटाच होता. अपघातानंतर त्यांना डेहराडून येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रियाही होऊ शकते. नुकताच तो बांगलादेशहून भारतीय संघासोबत मालिका खेळून परतला आहे. दुबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान तो एमएस धोनीसोबत दिसला होता.

एक डुलकी ऋषभ पंतच संपूर्ण करिअर संपवणार? जाणून घ्या खालील पॉइंटर मध्ये...

  • पंतच्या गुडघ्याला जबर दुखापत विकेट कीपरसाठी गुडघा फार महत्वाचा असतो.

  • या दुखापतीतून सावरण्यास ऋषभ पंतला लागू शकतो बराच काळ..

  • मध्यंतरीच्या काळात इतर विकेटकीपर चांगली कामगिरी केली तर ऋषभ पंत टीम इंडियात पुनरागमन अवघड...

  • वन-डे मध्ये ईशान किशन संजू सॅमसन आहेत प्रतिस्पर्धी...

  • कसोटीत केसी भरत देखील आहे रेसमध्ये...

मिळालेल्या माहितीनुसार 25 वर्षीय भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर तिला आग लागली. आईला सरप्राईज देण्यासाठी तो एकटाच घरी जात होता. अशा परिस्थितीत लवकरच मैदानात परतणे त्याच्यासाठी सोपे जाणार नाही. टीम इंडियाला 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. मात्र, दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर आहे. तो एनसीएमध्ये जाणार होता, पण आता अपघातामुळे त्याला बराच काळ बाहेर राहावे लागू शकतो.

श्रीलंका मालिकेनंतर भारताला न्यूझीलंडकडून मायदेशात वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पाहता ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. पंतचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्डही चांगला आहे, पण आता तो या मालिकेत क्वचितच प्रवेश करू शकेल. आता बीसीसीआयला त्याचा पर्याय शोधावा लागणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर युवा क्रिकेटपटू पंतची नजर असेल. त्याआधी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त परत यायचे आहे. 2011 पासून भारत विश्वचषक ट्रॉफीची वाट पाहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT