IPL 2023 | Rishabh Pant | Cricket News in Marathi sakal
क्रीडा

IPL 2023: भाऊ आला रे... अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच पोहोचला मैदानात

‘पायाला पट्टी, हातात काठी’ अन् पंत पोहोचला मैदानात...

Kiran Mahanavar

Rishabh Pant IPL 2023 : आयपीएलच्या 16व्या हंगामातील सातव्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्ससमोर दिल्ली कॅपिटल्स आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.

हा सामना केवळ दिल्लीच्या चाहत्यांसाठीच नाही तर भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठीही खास आहे. गेल्या वर्षी झालेल्या कार अपघातानंतर भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत पहिल्यांदाच स्टेडियममध्ये पोहोचला आहे.

पंतला कारमधून स्टेडियममध्ये आणण्यात आला. त्याला दोन-तीन जणांनी आधार देऊन गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर पंत वॉकिंग स्टिकच्या मदतीने पुढे सरकला. त्यानंतर तो स्टँडवर बसून सामना बघताना दिसला.

सामन्यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावरील हास्याने चाहत्यांची मने जिंकली. त्याला दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी पाठिंबा दिला. याशिवाय बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लाही पंतला भेटायला पोहोचले.

गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस त्यांची कार दुभाजकाला धडकली होती. यानंतर त्यांच्या कारला आग लागली. मात्र पंतला त्यातून बाहेर काढण्यात यश आले. अपघातानंतर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते त्यामुळे सावरायला वेळ लागेल.

शस्त्रक्रियेनंतर पंतने त्याचा फोटो शेअर करत त्याच्या रिकव्हरीबद्दल सांगितले. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो स्विमिंग पूलमध्ये फिरत आहे. पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. त्याच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. पंतच्या सन्मानार्थ दिल्ली संघ त्याची जर्सी त्यांच्या डगआउटमध्ये ठेवतो. ही जर्सी संपूर्ण सामन्यात डगआउटमध्ये राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT