Rishabh Pant
Rishabh Pant 
क्रीडा

Rishabh Pant: बरा हायस नव्हं...दुखापतग्रस्त पंतला पाहण्यासाठी रैना, भज्जी अन् श्रीसंत पोहचले घरी

सकाळ डिजिटल टीम

टीम इंडियाचा युवा खेळाडू ऋषभ पंत सध्या विश्रांती घेत आहे. दोन महिन्यांपूर्वी ऋषभचा जो अपघात झाला त्यानंतर आपल्या जखमा भरून येण्यासाठी तो आराम करतो आहे. लवकरच आपण टीम इंडियामध्ये परतू असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, टीम इंडियातल्या खेळाडूंना पंतशिवाय करमेना. विचारपूस करण्यासाठी रैना, भज्जी अन् श्रीसंत थेट त्याच्या घरी पोहचले आहेत. (Rishabh Pant Suresh raina harbhajan singh sreesanth meet photo viral )

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये रैना, भज्जी अन् श्रीसंत दिसत आहेत. सुरेश रैना, हरभजन सिंग आणि एस श्रीसंतने ऋषभ पंतची भेट घेतली. रैना आणि श्रीसंतने फोटो शेअर केलाय, ज्यात पंतचा दुखापतग्रस्त पाय दिसतोय.

श्रीसंतने फोटो शेअर करताना, पंतला मी माझा भाऊ मानतो असा उल्लेख केला आहे. श्रीसंतने त्याला स्वत:वर विश्वास ठेवायला सांगितला आहे. मी आणि पंत एकसारखेच आहोत. आमचा प्रेमाच्या भाषेवर विश्वास आहे. आयुष्य एकदाच मिळतं, त्यात भावाच प्रेम महत्वाच आहे. अशी भावना पंतने कॅप्शन देत व्यक्त केलीय.

सुरेश रैनाने सुद्ध फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये भावांच प्रेम सर्वकाही आहे, असं लिहिलय. पंत लवकर बरा होईल, तो पुन्हा भरारी घेईल असा विश्वास सुरेश रैनाने व्यक्त केलाय.

ऋषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ ला अपघात झाला. या कार अपघातात ऋषभ पंत खूप जखमी झाला. ऋषभ त्याच्या मर्सिडिझमधून दिल्लीहून रुरकीला जात होता.ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली त्यामुळे कारला आग लागली.

ऋषभ पंत विंड स्क्रिन तोडून बाहेर पडला होता. स्थानिकांनी त्याला ओळखलं आणि त्याला रुरकीमध्ये दाखल केलं. त्यानंतर देहरादून आणि मुंबईतल्या रूग्णालयांमध्ये त्याच्यावर उपचार झाले. आता ऋषभ हळूहळू बरा होतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT