Rishabh Pant Urvashi Rautela Controversy sakal
क्रीडा

Rishabh Pant : उर्वशी रौतेलासाठी पंतने केली नवी इंस्टा पोस्ट; व्हायरल झाली स्टोरी

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातील वाद खूप चर्चेत आला

Kiran Mahanavar

Rishabh Pant Urvashi Rautela Controversy : जागतिक क्रिकेट वर्तुळात ऋषभ पंत हळूहळू आपला दबदबा निर्माण करत आहे. ऋषभ पंत आपल्या डॅशिंग बॅटिंगने सर्वांचा लाडका झाला आहे. अशा या लाडक्या ऋषभ पंतचे नाव सातत्याने उर्वशी रौतेला या मॉडेलशी जोडले जाते. अलीकडेच, बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यातील वाद खूप चर्चेत आला आहे. उर्वशीने एका मुलाखतीत 'मिस्टर आरपी'बद्दल एक किस्सा सांगितला होता, त्यानंतर हा वाद सुरू झाला. आता पंतने त्याच्या इंस्टाग्रामवर आणखी एक नवीन स्टोरी शेअर केली आहे जी या वादाशी जोडली जात आहे.

Rishabh Pant instagram story

पंतने आपल्या स्टोरी मध्ये जो फोटो ठेवला आहे, त्यात लिहिले की, जे तुमच्या नियंत्रणात नाहीत त्या गोष्टींवर तुम्ही ताण देऊ नका.

उर्वशी रौतेलाने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, मी वाराणसीमध्ये शूटिंग करून दिल्लीला आले होते, जिथे माझा शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले. आरपी मला भेटायला आला होता आणि तो लॉबीमध्ये माझी वाट पाहत होते. मात्र मी शुटिंगमध्ये व्यग्र होते. नंतर मी थकून झोपले. मात्र मला 16 ते 17 मिसकॉल आले होते. आरपी अनेक तास माझी वाट पाहत होता मात्र मी त्याला भेटू शकले नाही यामुळे मी नाराज होते. त्यानंतर मी त्याला मुंबईत भेटू असे सांगितले. आम्ही मुंबईत भेटलो. मात्र या दरम्यान माध्यमांनी आम्हाला गाठले. त्यानंतर आमचे नाते संपले असेही ती म्हणाली.

ऋषभ पंतची इंस्टाग्राम स्टोरी सांगून व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, भारतीय क्रिकेटरने प्रतिक्रिया देताना म्हटले, 'किती मजेदार आहे की काही लोक लोकप्रियता मिळविण्यासाठी मुलाखतींमध्ये खोटे बोलतात. काही लोक लोकप्रियतेचे भुकेले आहेत हे किती वाईट आहे. देव त्यांना सुखी ठेवो. माझ्या बहिणीचा पाठलाग सोडा, खोट्यालाही मर्यादा असतात. पंतच्या याच पोस्टला उर्वशीनेही इंस्टा पोस्ट करत पलटवार केला आहे. 'छोटू भैय्याने फक्त बॅट-बॉल खेळावे. मी काही मुन्नी नाही जी बदनाम होईल, ती सुद्धा तुझ्यासाठी किडू प्रिय आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आरपी छोटू भैया. शांत मुलीचा गैरफायदा घेऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT