India vs New Zealand sakal
क्रीडा

IND vs NZ : टीम इंडियासाठी ऋषभ पंत करणार ओपनिंग ? शर्यतीत हे पण दिग्गज खेळाडू!

रोहित-विराट आणि राहुलसारख्या दिग्गज फलंदाजांच्या अनुपस्थितीत एक प्रश्न आहे की भारतीय संघाची फलंदाजी कशी असेल?

Kiran Mahanavar

India vs New Zealand : टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. तीन टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये खेळवला जाणार आहे. या दौऱ्यात रोहित-विराट आणि राहुलसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने या मालिकेत टीम इंडिया युवा खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. आता या दिग्गज फलंदाजांच्या अनुपस्थितीत एक प्रश्न आहे की भारतीय संघाची फलंदाजी कशी असेल? फलंदाजी क्रमातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ओपनिंग पोझिशनला कोण असणार आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

टी-20 मालिकेत भारतीय सलामीवीर कोण असेल? या प्रश्नाचे उत्तर पांड्या आणि लक्ष्मणच्या जोडीला शोधावे लागेल. भारतीय संघात सलामीचे अनेक दावेदार आहेत पण ओपनिंग कोण करणार हा प्रश्न आहे. ऋषभ पंत हा न्यूझीलंड टी-20 मालिकेत संघाचा उपकर्णधार असून या खेळाडूला सतत सलामी देण्याची मागणी होत आहे. पंतलाही इंग्लंडविरुद्ध सामन्यात संधी मिळाली पण त्याची बॅट चालली नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पंत हा फक्त सलामीवीर होता आणि अशा परिस्थितीत त्याला टॉप 2 पोझिशनमध्ये खेळता येईल का? तसे, सलामीवीर म्हणून पंत हा एक चांगला पर्याय असू शकतो.

दुसरा डावखुरा फलंदाज सलामीचा पर्याय आहे, तो म्हणजे इशान किशन. त्याने प्रत्येक वेळी आपली ताकद दाखवली आहे. किशनने टी-20 इंटरनॅशनलमध्येही चांगली खेळी केली आहे. मात्र, त्याला टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नाही. आता इशान किशनला 2024 टी-20 विश्वचषक पाहता अधिक परिपक्व बनवता येईल.

संजू सॅमसन हा देखील सलामीचा पर्याय आहे. हा खेळाडू मधल्या फळीतही चांगली कामगिरी करत असला आणि टीम इंडियाचा पुढचा फिनिशर मानला जात असला तरी टी-20 फॉरमॅटमध्ये सॅमसन सलामीवीर म्हणून कहर करू शकतो. त्याच्याशिवाय शुभमन गिलही सलामीचा दावेदार आहे. हा उजव्या हाताचा फलंदाज आयपीएलमध्येच सलामी करतो. याशिवाय गिलला एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्येही सलामीचा चांगला अनुभव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहे ती 'इच्छाधारी नागीण' झी मराठीने प्रोमो शेअर करत दाखवला चेहरा, 'ही' अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार

SCROLL FOR NEXT