Rivaba Jadeja Video  esakal
क्रीडा

Rivaba Jadeja Video : जडेजाची पत्नी रिवाबाचा तुफान राडा; महापौरांवरच काढला जाळ, खासदारही आल्या पट्ट्यात

अनिरुद्ध संकपाळ

Rivaba Jadeja Video : भारताचा क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा ही जामनगरची आमदार आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या रिवाबा या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रेंड होऊ लागल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रिवाबा जडेजा आणि महापौर बीना कोठारी तसेच खासदार पूनम माडम यांच्यासोबत कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला. यावेळी रिवाबा रागाच्या भरात महापौर बीना कोठोरी यांना लायकीत राहण्यास सांगत होत्या.

आमदार रिवाबा आणि बाकीच्या महिला नेत्या या जामनगर येथील लाखोटा तलाव परिसरात जामनगर महानगर पालिकेतर्फे आयोजित माझी माती - माझा देश या कार्यक्रमात उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान, रिवाबा महापौर मॅडमना म्हणतात की तुम्ही लायकीत रहा जास्त स्मार्ट होण्याची गरज नाही. याच्यावर महापौरांनी देखील प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर रिवाबा जाम भडकल्या. या व्हिडिओत रिवाबा महापौरांना बरंच काही बोलताना दिसत आहेत. यानंतर खासदार पूनम यांनी मध्यस्थी केली. रिवाबा यांनी खासदारांनाही सुनवायला मागेपुढे पाहिले नाही.

भाजपच्या या महिला नेत्यांच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलीस आणि कार्यकर्ते देखील दिसत आहेत. त्यांच्यासमोरच या महिला नेत्या एकमेकांना भिडल्या. पोलीस आणि कार्यकर्ते देखील या नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT