क्रीडा

ऑस्ट्रेलिया ओपनआधी; अ‍ॅडलेडच्या कोर्टवर बोपन्ना-रामकुमार जोडीचा डंका

सकाळ डिजिटल टीम

अंतिम सामन्यात भारताच्या जोडीने टॉप रँकिंगमध्ये असणाऱ्या डोडिंग आणि मार्सेलो मेलो यांना सरळ सेटमध्ये पराभूत केलं.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेआधी भारताच्या रोहन बोपन्ना आणि रामकुमार रामनाथन यांनी अॅडलेडच्या कोर्टवर डंका वाजवला आहे. भारताच्या रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) आणि रामकुमार रामनाथन (Ramkumar Ramnathan) या पुरुष जोडीने रविवारी अॅडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. त्यांनी इवान डोडिग आणि मार्सेलो मेले यांना पराभूत करून या स्पर्धेत बाजी मारली. बोपन्ना आणि रामकुमार यांनी बोस्नियाच्या टोमिस्लाव्ह बर्किच आणि मेक्सिकोच्या सेंटियागो गोंजालेज यांना हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती.

एटीपी टूरमध्ये पहिल्यांदा एकत्र खेळणाऱ्या रोहन बोपन्ना आणि रामकुमार यांनी रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात टॉप रँकिंगमध्ये असणाऱ्या डोडिंग आणि मार्सेलो मेलो यांना सरळ सेटमध्ये पराभूत केलं. एक तास २१ मिनिटं चाललेल्या या सामन्यात 7-6 (6), 6-1 अशा फरकाने त्यांनी विजय मिळवला. चारही ब्रेक पॉइंट वाचवून त्यांनी दोन वेळा प्रतिस्पर्ध्यांची सर्विससुद्धा ब्रेक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात शिक्षकांची रिक्त पदे, बी.एल.ओ नेमणूकीने शिक्षणाचा खेळखंडोबा

Muddy Water Supply : शिरूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा; पाणी इतके घाण कि आंघोळही करणे टाळले

Junnar News : पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या नागरिकाचा मृतदेह शोधण्यात पोलिस प्रशासन व रेस्क्यू पथकाला आले यश

शाळेत निघालेल्या ९ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार! नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप; सोलापूर जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, फिर्यादी असलेल्या पीडितेच्या आईचे निधन, तरीपण...

SCROLL FOR NEXT