Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : बोपन्ना - भोसलेंनी मिश्र दुहेरीत रौप्य पदक केलं निश्चित

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताने टेनिसमध्ये आज रौप्य पदक निश्चित केले. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिस मिश्र दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी तैवानच्या चान हाओ चिंग आणि यू हसू या तैवानच्या जोडीचा सेमी फायनलमध्ये पराभव केला. त्यांनी जरी रौप्य पदक निश्चित केले असले तरी त्यांचा डोळा हा सुवर्ण पदकावरच असणार आहे.

रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले या जोडीने तैवानच्या जोडीचा 6-1, 3-6, (10-4) असा पराभव केला. पहिला सेट 6 -1 असा आरामात जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तैवानच्या जोडीने बोपन्ना आणि ऋतुजा यांना कडवे आव्हान दिले. दुसरा सेट गमावल्यानंतर भारतीय जोडीने टाय ब्रेकरमध्ये चांगली कामगिरी करत 10 गुण घेत फायनलचे तिकीट निश्चित केले.

भारताने एशियन गेम्समध्ये आतापर्यंत 32 पदके पटकावून पदक तालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. भारताने 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची सर्वाधिक पदके ही शुटिंगमधून आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईकर घामाने भिजणार! पुढील ३ दिवसात तापमानात मोठे बदल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज

Latest Marathi News Live Update : अमित शहा आज कोलकाता दुर्गा पूजा चेंगराचेंगरीतील जखमींची भेट घेणार

Female Judge Dowry FIR : महिला न्यायाधीशाचा ३० लाखांच्या हुंड्यासाठी छळ, इंजिनिअर पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

Gokul Election: गोकुळ’साठी आज चुरशीने मतदान, सहा बोटांना शाई शक्य

Ethanol Production,: साखरेपासून इथेनाॅल निर्मितीवर बंदी;मक्यापासून निर्मित इथेनाॅलच्या भावातही कपात

SCROLL FOR NEXT