Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : बोपन्ना - भोसले जोडीची गोल्डन कामगिरी; प्रिती पवारने पदक निश्चित करत ऑलिम्पिक कोटाही मिळवला

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताने आज शुटिंगमधील रौप्य पदकानंतर टेनिसमध्ये सुवर्ण पदक जिंकले. भारताच्या रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले या जोडीने टेनिस मिश्र दुहेरीमध्ये सुवर्ण पदकाची कामाई केली. भारताचे हे आतापर्यंत 9 वे सुवर्ण पदक आहे. भारताची पदक संख्या आता 35 झाली असून पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर आहे.

याचबरोबर महिला बॉक्सिंगमध्ये 50 ते 54 किलो वजनी गटात प्रितीने सेमी फायनलमध्ये प्रवेश करत पदक निश्चित केले. याचबरोबर तिने पॅरिस ऑलिम्पिक कोटा देखील मिळवला.

सुवर्ण पदकासाठीच्या सामन्यात रोहिन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी तैवानच्या एन शूओ लिआंग आणि त्सुंग हाओ हुआंग या जोडीचा 2 - 6, 3 - 6 (4-10) असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने जोरदार कमबॅक केले.

त्यांनी दुसरा सेट 4 - 3 अशा पिछाडीवरून जिंकला. टाय ब्रेकरवर गेलेल्या या सेटमध्ये भारतीय जोडीने 3 - 6 (4 - 10) असा जिंकत सुवर्ण पदकावर कब्जा केला. भारताचे हे यंदाच्या एशियन गेम्समधील 9 वे सुवर्ण पदक आहे. भारताची पदकसंख्या आता 35 वर पोहचली आहे.

दुसरीकडे बॉक्सिंगमध्ये भारतीय महिलांनी दमदार कामगिरी केली. ऑलिम्पिक पदक विजेती लवलिना बोरगोहानने महिला 66 ते 75 किलो गटात सेमी फायनलमध्ये प्रवेश करत पदक निश्चित केले. तर प्रितीने 50 ते 54 किले वजनी गटात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्हाला विचारात घेत नाहीत, अजितदादा ITवाल्यांचं ऐकतात, बैठकीलाही बोलावत नाहीत; हिंजवडीच्या सरपंचांचे गंभीर आरोप

Jasprit Bumrah: कसे असेल बुमराचे भवितव्य, आशिया कपमध्ये खेळणार नाही? गंभीर - आगरकरसमोर मोठं आव्हान

IND vs ENG 5th Test: खोटारडे! यशस्वीसमोर स्पिनर आणायला घाबरला ऑली पोप, अम्पायरशी बोलला खोटं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates Live: बीड, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतीच; लोकांना न्याय मिळत नसल्याची खंत - सुप्रिया सुळे

Malegaon Crime : मालेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट! किरकोळ वादातून तरुणाचा खून

SCROLL FOR NEXT