Rohit Sharma breaks AB de Villiers Record sakal
क्रीडा

Rohit Sharma : दिवाळीत रोहित शर्माकडून षटकारांची आतिषबाजी! मोडीत काढला ABDचा विश्वविक्रम

Kiran Mahanavar

Rohit Sharma breaks AB de Villiers Record : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या लीग टप्प्यातील शेवटचा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि स्फोटक सुरुवात करून दिली. या सामन्यादरम्यान हिटमॅनने षटकार मारण्याच्या बाबतीत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

रोहितने वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला

रोहित शर्माने एबी डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडला आहे. रोहितने बेंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्ध पहिला षटकार ठोकताच, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला. डिव्हिलियर्सने 2015 मध्ये 58 षटकार मारले होते. रोहितने त्याला मागे टाकत यावर्षी 60 षटकार ठोकले आहेत.

एका कॅलेंडर वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक षटकार

  • 60 षटकार - रोहित शर्मा 2023*

  • 58 षटकार - 2015 मध्ये एबी डिव्हिलियर्स

कर्णधार म्हणून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार

  • 24 - रोहित शर्मा (2023)*

  • 22 - इऑन मॉर्गन (2019)

  • 21- एबी डिव्हिलियर्स (2015)

  • 18 - आरोन फिंच (2019)

  • 17 - ब्रेंडन मॅक्क्युलम (2015)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT