ICC World Cup 2023 Tournament Team  esakal
क्रीडा

ICC World Cup Team : आयसीसीने निवडली वर्ल्डकपची टीम; कमिन्स जिंकला तरी रोहितच कर्णधार

अनिरुद्ध संकपाळ

ICC World Cup 2023 Tournament Team : आयसीसीने वनडे वर्ल्डकप 2023 चा संघ निवडला आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्माला करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या संघात रोहितसह सहा खेळाडूंचा समावेश आहे. जरी भारताने वर्ल्डकप जिंकला नसला तरी आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेच्या संघात भारतीयांचा दबदबा राहिला.

आयसीसीचा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा सर्वोत्तम संघ -

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक) (द. आफ्रिका), रोहित शर्मा (कर्णधार) (भारत), विराट कोहली (भारत), डॅरिल मिचेल (न्यूझीलंड), केएल राहुल (भारत), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), रविंद्र जडेजा (भारत), जसप्रीत बुमराह (भारत), दिलशान मदुशंका (श्रीलंका), ऍडम झम्पा (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद शमी (भारत), गेराल्ड कोएट्झी (१२ वा खेळाडू), (द. आफ्रिका)

ऑस्ट्रेलियाने यंदाच्या वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. मात्र आयसीसीच्या संघात दोनच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू एडम झाम्पा यांचा समावेश आहे.

याचबरोबर सेमी फायनल मध्ये पोहचलेल्या दक्षिण अफ्रिकेचे दोन खेळाडू या संघात आहेत. सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि अष्टपैलू खेळाडू जेराल्ड कोट्झी (12 वा खेळाडू) यांचा समावेश आहे.

याचबरोबर न्यूझीलंडचा डॅरेल मिचेलचा आणि श्रीलंकेच्या दिलशान मदुशान यांचा देखील संघात समावेश आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : गुडलक कॅफे प्रकरणाची व्यवस्थापनाकडून दखल, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु

SCROLL FOR NEXT