Rohit Sharma Cheteshwar Pujara WI vs IND esakal
क्रीडा

Rohit Sharma WI vs IND : रोहित अन् पुजाराबाबत BCCI अधिकाऱ्याने दिली मोठी अपडेट; विंडीज दौऱ्यावर...

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma Cheteshwar Pujara WI vs IND : भारताचा कर्णधार रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांना विंडीज दौऱ्यावर विश्रांती देण्यात येईल असे वृत्त आले होते. ही विश्रांती म्हणजे पुजारासाठी एक प्रकारे कसोटी संघातून यांना डच्चू देण्यातलाच प्रकार असेल असाही अंदाज वर्तवला जात होता. रोहितकडून कसोटी संघाचे कर्णधारपद काढून घेतले जाईल असेही बोलले जात होते. आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार असं काहीही होणार नाहीये.

भारतीय संघासाठी वाईट बातमी ही आहे की केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह हे भारत आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध असणार नाहीत. कारण ते अजून दुखापतीतून सावरून पूर्णपणे फिट झालेले नाहीत. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा आपली कसोटी संघातील जागा राखेल.

जरी पुजाराला डच्चू मिळणार नसला तरी सर्फराज खानच्या कसोटी संघातील निवडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाहीये. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत शतकांचा रतीब घातला होता. त्यामुळे निवडसमिती त्याला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात घेण्यासाठी उत्सुक आहे.

बीसीसीआय अधिकारी इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'रोहित शर्मा हा फिट आहे आणि तो संघ निवडीसाठी उपलब्ध आहे. त्याला चांगली सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत वर्कलोड मॅनेजमेंटची समस्या नाहीये. तो वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करेल.'

रोहित शर्माला आयपीएल आणि WTC Final मध्ये विजेतेपदाला गवसणी घालण्यात अपयश आले. मात्र त्याची वनडेमधील गेल्या 12 महिन्यातील सरासरी ही 49.27 इतकी आहे. त्याने गेल्या 13 डावात एक शतक आणि चार अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट देखील 111.52 इतके आहे. कसोटीत त्याने 5 सामन्यात 37.5 ची सरासरी राखली आहे. त्याच्या फॉर्मवर टीका करण्याची घाई करू नये.

बीसीसीआय अधिकारी म्हणाला की, 'होय त्याला आयपीएल आणि WTC Final मध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत. मात्र त्याने नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतकी खेळी केली होती. तो त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. त्याच्या फॉर्मबाबत त्याच्यावर आता टीका करणे हे योग्य होणार नाही.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT